विवाहित आयएएस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा आरोप

| Updated on: Jun 17, 2021 | 9:18 AM

आयएएस अधिकाऱ्याने हे बाळ आपलं असल्याचा इन्कार केल्यामुळे पीडितेने डीएनए टेस्टची मागणी केली आहे. न्यायासाठी राष्ट्रपतींनाही तिने पत्र लिहिलं आहे.

विवाहित आयएएस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा आरोप
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
Follow us on

लखनौ : खोट्या लग्नाच्या नावाखाली फसवून विवाहित आयएएस अधिकाऱ्याने लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्याचा आरोप एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने केला आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये (Aligarh) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर आरोपीने आपल्याशी खोटा विवाह केला. मात्र बलात्कार करुन तो पसार झाला, असा आरोप पीडितेने केला आहे. (IAS Gaurav Dahiya accused of Sexual Exploitation by MBBS Student)

काय आहे आरोप

आरोपी गौरव ढईया गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागात संचालक पदावर तैनात आहेत. ढईया यांनी फेसबुकवर आपल्याला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती. सुरुवातीच्या चॅटिंगनंतर आपली मैत्री झाली. त्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडले, असा दावा पीडितेने केला आहे.

आरोपी आणि पीडितेला मुलगी

गौरव ढईया यांनी दिल्लीला नेऊन आपल्यावर बलात्कार केला. आपले अश्लील फोटो काढले. आपण विरोध केल्यानंतर त्याने लग्नाचं आमिष दाखवलं, असा आरोप पीडितेने केला आहे. प्रत्यक्षात आरोपी ढईया हे विवाहित आहेत, परंतु त्यांनी विद्यार्थिनीपासून ही माहिती लपवल्याचं बोललं जातं. धक्कादायक म्हणजे ढईया यांनी पीडितेशी खोटा विवाहही केला. त्यानंतर दोघं एकत्र राहू लागले. त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर ते पीडिता आणि बाळाला सोडून पसार झाल्याचा आरोप आहे.

इच्छामरण देण्याची मागणी

आयएएस अधिकाऱ्याने हे बाळ आपलं असल्याचा इन्कार केल्यामुळे पीडितेने डीएनए टेस्टची मागणी केली आहे. न्यायासाठी राष्ट्रपतींनाही तिने पत्र लिहिलं आहे. अन्यथा इच्छामरण देण्याची मागणीही तिने पत्रात केली आहे.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दुसरीकडे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

(IAS Gaurav Dahiya accused of Sexual Exploitation by MBBS Student)