नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ
प्रातिनिधिक फोटो

महिला पोलीस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे (Washim Police Constable Raped )

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 04, 2021 | 3:36 PM

विठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम : वाशिममधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. (Washim Lady Police Constable allegedly Raped by Nanded Police Inspector)

आरोपी अर्धापुर ठाण्यात पोलीस निरीक्षक

स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर कलम 376 सह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ओळखीचा गैरफायदा घेत घरी आल्याचा दावा

वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विश्वकांत गुट्टे 2007 मध्ये पीएसआय पदावर कार्यरत होते. त्यावेळी तक्रादार महिला पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे आपल्या घरी आले आणि त्यांनी जबरदस्ती करत बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

या प्रकरणी काल वाशिम शहर पोलिसांत 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितलं. पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

(Washim Lady Police Constable allegedly Raped by Nanded Police Inspector)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें