AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुलुंड अपघातानंतर पहिली मोठी कारवाई, एकनाथ शिंदेंनी दिले निलंबनाचे आदेश

Mulund Accident : मुलुंड येथे सुरु असलेल्या मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मोठी बातमी! मुलुंड अपघातानंतर पहिली मोठी कारवाई, एकनाथ शिंदेंनी दिले निलंबनाचे आदेश
Mulund Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 14, 2026 | 10:42 PM
Share

मुंबईत आज दुपारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंड येथे सुरु असलेल्या मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला. दोन गाड्यांवर मलबा कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच आता या घटनेनंतर सरकारकडून पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सत्यजित साळवे निलंबित

मुलूंड अपघातानंतर उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेला जबाबदार सत्यजित साळवे या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निलंबित करण्यात आले आहे. तसेच मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. त्याचबरोबर दुर्घटनाग्रस्त मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंरनीला कन्सल्टंट करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला 1 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अपघाताला जबाबदार असणारी मिलन इंफ्रा कंपनीला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच MMRDA कडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 15 लाख रूपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मुंबईतील मुलुंडच्या फायर बिग्रेड घडलेल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोण आहे मृत व्यक्ती?

उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्हातील सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंड परिसरात सरपंच यादव यांच्या मित्राचे ऊसाच्या रसाचे दुकान आहे. याच दुकानामधून कळव्यातील एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी सरपंच आणि माजी सरपंच रिक्षाने निघाले होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास मेट्रोचा सिमेंट ब्लॉक कोसळून सरपंच रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरपंच मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मात्र, या मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात