शिक्षकच बनला भक्षक ! तब्बल सात शाळकरी मुलींची पोलिसांत तक्रार; कुठं घडली धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना?

| Updated on: Jan 31, 2023 | 10:27 AM

शिक्षक गुरु असतात, त्याच गुरुने असं गैरकृत्य केल्यानं शालेय वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

शिक्षकच बनला भक्षक ! तब्बल सात शाळकरी मुलींची पोलिसांत तक्रार; कुठं घडली धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना?
Image Credit source: Google
Follow us on

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी : तब्बल सात मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून गैरकृत्य केल्याची धक्कादायक बाब कोल्हापुरात उघडकीस आली आहे. यावरून पीडित शाळकरी मुलींच्या तक्रारीवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधानगरी पोलीसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या असून अधिकचा तपास सुरू केला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याची बाब उघडकीस आल्याने कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही कोल्हापूरमधील पालकांकडून केली जात आहे. . व्ही. पी. बांगडी असं नराधम शिक्षकांचे नाव आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी संस्थेने तात्काळ शिक्षकांची बदलीही साताऱ्यात करून टाकली होती. मात्र, पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलीसांनी दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे.

सात मुलींना नको तिथे स्पर्श करून नराधम शिक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलींच्या पालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात केली होती, त्यावरून राधानगरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपी व्ही. पी. बांगडी या शिक्षकाला राधानगरी पोलीसांनी अटकही केली असून अधिकचा तपास केला आहे. याशिवाय आणखी मुलींवर अत्याचार केले आहे का? याबाबतचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

व्ही. पी. बांगडी हा शिक्षक नववी आणि दहावीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता, त्यानंतर त्यांना नको तिथं स्पर्श करून विनयभंग करत होता, मुलींनी ही बाब पालकांना सांगितल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

शिक्षक गुरु असतात, त्याच गुरुने असं गैरकृत्य केल्यानं शालेय वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

तब्बल दोन वर्षाहून अधिक काळापासून व्ही. पी. बांगडी हा शिक्षक शाळकरी मुलींवर अत्याचार करत होता. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालंकार शेळेवाडी शाळेत ही संतापजनक घटना घडली आहे.