तासभर खाणं नाही, शेवाळयुक्त पाणी पाजलं, मकाऊ पोपटाचा सोलापुरात मृत्यू, दोघांवर गुन्हा

| Updated on: Oct 17, 2021 | 11:51 AM

मकाऊ पोपटाच्या मृत्यूप्रकरणी प्राणी संग्रहालयातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचे कीपर भारत शिंदे आणि प्राणी संग्रहालयाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक अधिनियमानुसार विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

तासभर खाणं नाही, शेवाळयुक्त पाणी पाजलं, मकाऊ पोपटाचा सोलापुरात मृत्यू, दोघांवर गुन्हा
Parot Death
Follow us on

सोलापूर : मकाऊ पोपटाच्या मृत्यूप्रकरणी प्राणी संग्रहालयातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचे कीपर भारत शिंदे आणि प्राणी संग्रहालयाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक अधिनियमानुसार विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात हैद्राबाद येथून सात वर्षांपूर्वी आणलेल्या सप्तरंगी पोपटांचा जोडीचा मृत्यू झाला होता. प्राणीसंग्रहालयातील दुरावस्था पाहून केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मकाऊ पक्षांना सिद्धेश्वर वनविहारात ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुर्दैवाने दहा दिवसांच्या अंतराने सप्तरंगी पोपटांच्या जोडीचा मृत्यू झाला.

पर्यटकांच्या मनोरंजनासाठी 2016 मध्ये तब्बल अडीच लाख रुपये खर्चून मकाऊची जोडी आणण्यात आली होती. त्यानंतर छोट्या विविधरंगी विदेशी पक्षांचा त्यानंतर मृत्यू झाला होता. दम्यान प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात विदेशी पक्षांना प्राणी संग्रहालयात ठेवलेच कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे सप्तरंगी पोपटाच्या जोडीला सिद्धेश्वर वन विहारातील एका पिंजर्‍यात करण्यात आले होते. सध्या सोलापूर महानगरपालिकेकडून या पक्ष्यांच्या मृत्यू संदर्भात संदर्भातल शोध घेतला जात होता.

मकाऊ पोपटाच्या मृत्यूच्या तपासादरम्यान एक धक्कादायक गोष्ट पुढे आली आहे. एक तास योग्य खाद्य न दिल्याने, तसेच शेवाळ युक्त पाणी दिल्याने पोपटाचा मृत्यू झाल्याचा अहवाल पशुवैद्यकीय चिकित्सकाने दिला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सेव आयुक्त पाणी आणि पोपटाचे पंख जप्त केले आहेत. ही मकाऊ पोपटांची जोडी साडेतीन लाख रुपयांचे होते.

संबंधित बातम्या :

सोलापुरात महिलेची हत्या करुन मृतदेह झुडपात फेकला, पोटच्या मुलावर संशय

सोलापूर नरबळी प्रकरण, संत दामाजी साखर कारखान्याच्या माजी संचालकांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू