औरंगाबादेत गुंडगिरी सुरुच, गेटसमोर थांबू नका सांगितल्याचा राग, टोळक्याची तोडफोड

गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून टोळक्याने कंपनी परिसरात तोडफोड केली. आकार टूल्स कंपनीच्या केबिनची टोळक्याने तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. तोडफोड करणाऱ्या सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेत गुंडगिरी सुरुच, गेटसमोर थांबू नका सांगितल्याचा राग, टोळक्याची तोडफोड
औरंगाबादमध्ये टोळक्याची तोडफोड
Reporter Datta Kanwate | Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 07, 2021 | 11:24 AM

औरंगाबाद : औरंगाबादेतील गुंडगिरीची आणखी एक घटना समोर आली आहे. गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून टोळक्याने तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे औरंगाबादमधील उद्योजगांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून टोळक्याने कंपनी परिसरात तोडफोड केली. आकार टूल्स कंपनीच्या केबिनची टोळक्याने तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. तोडफोड करणाऱ्या सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम भोगलेंच्या कंपनीत गुंडगिरी

दरम्यान, औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.

काय घडलं होतं?

आमच्या कारखान्यातील एका कामगाराने डायल्युटेड सोप वाटर प्यायलं होतं. त्यानंतर आम्ही त्या कामगाराला रुग्णालयात भरती केलं, मात्र त्यानंतर आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने आमच्या कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. यानंतर पोलीस येतायत म्हटल्यानंतर या सगळ्यांनी पळ काढला पण असे प्रकार सातत्याने आणि उद्योगात सर्वत्र घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं राम भोगले या प्रकारानंतर म्हणाले होते.

उद्योगपतीची कामगाराला मारहाण

दरम्यान, उद्योगपतीनेच कामगाराला मारहाण केल्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. औरंगाबादमधील एमआरए लॉजीस्टिक कंपनीच्या मालकाने कामगाराला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘काम का देत नाही?’ असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याचा आरोप झाला होता. राजू फकिरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर मुकेश शरावत असं मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाचे नाव आहे. मारहाण प्रकरणी कामगाराने औरंगाबादमधील वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगून खंडणीवसुली, औरंगाबादमध्ये दादागिरी करणारे दोघे रंगेहाथ

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप

Follow Us