तीन ग्लास, हार आणि चॉकलेट, डोंगरावर दोन तरुणी-एका तरुणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तूंचा अर्थ काय?

सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर तिघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. या डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थ जात असतानाच त्यांना तिघे जण मृतावस्थेत दिसले.

तीन ग्लास, हार आणि चॉकलेट, डोंगरावर दोन तरुणी-एका तरुणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तूंचा अर्थ काय?
सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 24, 2021 | 2:47 PM

सांगली : दोन तरुणी आणि एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच सांगलीत उघडकीस आली होती. घटनास्थळावर विषारी औषधाची बाटली, तीन ग्लास, लग्नात वापरण्यात येणारे हार आणि चॉकलेट असे साहित्य आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रेमसंबंधातून आत्महत्येचा प्रकार घडल्याचा संशय आहे. मात्र एकाच वेळी तिघांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर तिघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. हरीश हणमंत जमदाडे (24), प्रणाली उद्धव पाटील (19), शिवानी चंद्रकांत घाडगे अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणींची नावे आहेत. हरीश जमदाडे आणि प्रणाली पाटील हे दोघे मणेराजुरीतील रहिवासी असून शिवानी घाडगे ही सांगोला तालुक्यातील हतीत गावची रहिवासी आहे.

मणेराजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगर आहे. या डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थ जात असतानाच त्यांना तिघे जण मृतावस्थेत दिसले. याची माहिती पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांना देण्यात आली.

घटनास्थळी काय काय आढळलं?

घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्ष बागेवर फवारण्याची विषारी द्रव्याची बाटली सापडली. याशिवाय तीन ग्लास, लग्नात वापरण्यात येणारे हार-तुरे, चॉकलेट अशा वस्तू सापडल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

बुधवारी रात्रीच्या सुमारास हे तिघे डोंगरावर आल्याचा अंदाज असून आत्महत्येमागे प्रेमसंबंधांचे कारण असावे, अशी चर्चा आहे. तिघांचा एकमेकांशी संबंध काय? ही आत्महत्या आहे की हत्या? या सर्व बाजूंचा पोलीस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?

दोन गाड्यांची समोरासमोर धडक, दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर

वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला ग्राहकाची मारहाण, टिकाव डोक्यात टाकण्याचा प्रयत्न

Follow Us