मालेगाव शहर का बनले ‘कुत्ता’ गोळीचे हब, पोलीसांच्या कारवाई देशातील कोणत्या दोन राज्याचं कनेक्शन ?

| Updated on: Nov 15, 2022 | 3:05 PM

मेंदूवर परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही स्टोअर्समध्ये या गोळ्या सर्रासपणे मिळतात.

मालेगाव शहर का बनले कुत्ता गोळीचे हब, पोलीसांच्या कारवाई देशातील कोणत्या दोन राज्याचं कनेक्शन ?
Image Credit source: Google
Follow us on

मालेगाव, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील कुत्ता गोळीचे संकट काही केल्या कमी होत नाहीये. नुकतीच अन्न औषध प्रशासनाने मालेगावमध्ये मोठी कारवाई केली आहे. हजारो रुपयांचा कुत्ता गोळीचा साठा सापडल्याने खळबळ उडाली असून नशेसाठी वापर केली जाणारी कुत्ता गोळी शहरात येतेच कशी याबाबतचा कसून तपास केल्यावर देशातील दोन राज्यांचं कनेक्शन असल्याचा प्रशासनाला संशय आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात कनेक्शन यामध्ये दिसून येत असून मालेगावमध्ये कुत्ता गोळीचे ठिकठिकाणी एजंट असल्याची देखील महिती समोर येत आहे. कुत्ता गोळीचे हब म्हणून मालेगाव शहराची ओळख बनत चालली असून अनेक तरुण कुत्ता गोळीच्या सेवनाने व्यसनी बनत असून औषध विक्रेत्यांवर पोलिसांची नजर आहे. खरंतर दारूची नशा करण्यासाठी लागणारे पैसे बघता कुत्ता गोळीची नशा कमी पैशात होत आहे. दोन ते तीन रुपयांना ही कुत्ता गोळी मिळते, विशेष म्हणजे काही क्षणातच या कुत्ता गोळीची नशा संपूर्ण अंगात भिनते त्यामुळे कुत्ता गोळीची नशा करणारी संख्या मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये कुत्ता गोळीची नशा करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई देखील केली जात आहे.

तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने मुस्लिम संघटना आणि मालेगाव पोलीसांनी याबाबत जनजागृती करत कुत्ता गोळीपासून दूर राहा याबाबत आव्हान केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र, दारूची नशा महागडी वाटत असल्याने अवघ्या दोन ते तीन रुपयांना मिळणारी कुत्ता गोळी नशेसाठी सोपी असल्याने तरुणाई आहारी गेली आहे.

मालेगाव मधील 18 ते 30 वर्ष वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली असून 15 गोळ्या 36 रुपयांना मिळत असल्यानं अनेक तरुणांचा या गोळीचे व्यसन लागले आहे.

कुत्ता गोळीचं खरं नाव अल्प्रलोजोम असं आहे, गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे.

मेंदूवर परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही स्टोअर्समध्ये या गोळ्या सर्रासपणे मिळतात.

मध्य प्रदेश, गुजरात तसेच भिवंडी परिसरातून या गोळ्या आणल्या जातात. काहीजणांनी हरियाणामधून देखील गोळ्या आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.