बायकोसोबत राहत नाही म्हणून दादर आणि कल्याण स्टेशन उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

| Updated on: Mar 30, 2024 | 11:08 PM

पतीने दादर आणि कल्याण स्टेशन बॉम्बने उडवून देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. बायकोसोबत राहत म्हणून त्यानेस असं कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

बायकोसोबत राहत नाही म्हणून दादर आणि कल्याण स्टेशन उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
दादर रेल्वेल स्टेशन उडवण्याची धमकी देणाऱ्या फोनने खळबळ
Follow us on

बायकोसोबत राहत नसल्यामुळे तिला घाबरविण्यासाठी आरोपीने फोन करून धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. नालासोपाऱ्यात पेल्हार पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला आज वसई न्यायालयात हजर केले असता एक एप्रिल पर्यन्त दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बायकोसोबत राहत नसल्यामुळे तिला घाबरविण्यासाठी आरोपीने फोन करून धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.

विकास उमाशंकर शुक्ला( वय 35 ) असे अटक आरोपीचे नाव असून हा नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरातील वनोठापाडा येथील ओमसाई चाळ मधील रहिवाशी आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय च्या 112 कंट्रोल रूम वर 29 मार्च रोजी अनोळखी मोबाईल वरून दादर आणि कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवुन देण्याची धमकीचा कॉल आला होता. या कॉल चे लोकेशन घेऊन, पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या टीम ने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

या आरोपी विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात रजि नंबर भादविस 505 (1) (ब), 505 (2), 182 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे पोलिसांना फोन करत असेल तर धोकादायक आहे. कारण पोलिसांनी अशी फसवणुक वारंवार झाली तर पोलीसही कंटाळून नंतर जातीने लक्ष देणार नाहीत.

दरम्यान, भविष्यात खरंच जर अशी घटना घडली म्हणजे असा फोन आला पण नेहमीप्रमाणेच कोणीतरी केला असं समजून पोलीस खात्याने गांभीर्याने घेतलं नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे असा फेक फोन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली गेली पाहिजे. कारण परत कोणीही अशा प्रकारचं कृत्य करताना त्याली खाकीची धास्ती असायला हवी.