लैंगिक अत्याचाराबरोबरच अल्पवयीन मुलींकडून करवून घेत होता वेठबिगारी, आधारश्रमातील आणखी एक कारनामा…

| Updated on: Dec 01, 2022 | 9:29 AM

सुरुवातीला एका अल्पवयीन पीडितेने आपल्यावर संचालक हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची बाब आई-वडिलांना सांगितल्याने त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लैंगिक अत्याचाराबरोबरच अल्पवयीन मुलींकडून करवून घेत होता वेठबिगारी, आधारश्रमातील आणखी एक कारनामा...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील आधारआश्रमात लैंगिग अत्याचाराच्या सहा घटना समोर आल्यानं खळबळ उडाली होती. यामध्ये शिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे समोर आल्याने आधारश्रमाच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला होता. यामध्ये संशयित आरोपी संचालक हर्षल मोरे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायायलयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामध्ये त्याच्यावर पोक्सो कायद्यानंतर्गत बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. याबाबत म्हसरूळ पोलीस अधिकचा तपास करत असतांना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नराधम हर्षल मोरे अल्पवयीन मुलींकडून दुपारी जेवण झाल्यावर एका फ्लॅटमध्ये ठेवलेल्या द्रोण मशीनवरुन द्रोण बनवून घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये बाल कामगार म्हणून अल्पवयीन मुलांचा वापर केल्यानं वेठ बिगारीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हर्षल मोरे यांचे द किंग फाउंडेशन संचालित ज्ञानदिप आधार आश्रम आहे, ते देखील परवानगी विना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला एका अल्पवयीन पीडितेने आपल्यावर संचालक हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची बाब आई-वडिलांना सांगितल्याने त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हे सुद्धा वाचा

त्यावरून हर्षल मोरे याच्यावर पाहिला गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये आधारश्रमातील सर्वच मुलींची चौकशी केली असता त्याने आणखी पाच मुलींवर लैंगिग अत्याचार केल्याची बाब समोर आली.

त्यामुळे एकूण सहा गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले असून म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या कस्टडीत सध्या हर्षल मोर आहेत, त्यामध्ये आता तो अल्पवयीन मुलींकडून द्रोण बनवून घेण्याचे काम करीत असल्याचे समोर आले आहे.

मुलींचे जेवण झाल्यावर तो द्रोण बनवून घेत असल्याचे तपासात समोर आल्याने म्हसरूळ पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने बाल कामगार कायद्यानुसार आणखी एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याची शक्यता आहे.