CCTV | रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबातील लेकराचं अपहरण, चार तासात आरोपी गजाआड

जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलाचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपला मुलगा बेपत्ता झासल्याची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती

CCTV | रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबातील लेकराचं अपहरण, चार तासात आरोपी गजाआड
रस्त्याशेजारी राहणाऱ्या मुलाचं अपहरण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 29, 2021 | 10:49 AM

मुंबई : रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लहान मुलाचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या चार तासात आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईतील जुहू चौपाटी परिसरात हा प्रकार घडला होता. अपहरणाच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलाचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपला मुलगा बेपत्ता झासल्याची तक्रार पालकांकडून पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

अपहरणाची घटना कॅमेरात कैद

सांताक्रुझ पोलिसांनी जुहू चौपाटी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा अपहरण करताना आरोपी कॅमेरामध्ये कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करण्यासाठी पाच पथकं तयार केली.

ड्रग्ज प्रकरणात आरोपीवर गुन्हे

विशेष म्हणजे अपहरणाच्या घटनेनंतर अवघ्या 4 तासांच्या आतमध्ये आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या साईद शेख या आरोपीच्या विरोधात चोरी, ड्रग्ज प्रकरण यासारखे विविध गुन्हे दाखल आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुण्यात उधार व्हिस्की न दिल्याच्या रागातून एकाने वाईन शॉप मालकाच्या डोक्यात घातला कोयता

पाकिस्तानचा मजनू, बॉर्डर पार करुन मुंबईत, लैला नेमकी कुठं गेली? सोशल मीडियावरची दिवानी लव्ह स्टोरी

नागपुरात एकाच दिवशी दोन खून! दुपारच्या रागाचा रात्री बदला; दारु पिण्याच्या वादातून खून

Follow Us