21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघा मित्रांचं अंबरनाथमध्ये दुष्कृत्य

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात जीआयपी डॅम परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते.

21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघा मित्रांचं अंबरनाथमध्ये दुष्कृत्य
अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 1:50 PM

अंबरनाथ : 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीय आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रं फिरवत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात जीआयपी डॅम परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते.

मित्राकडून तरुणीवर बलात्कार

तिचा मित्र हनुमान हिलम हा रविवारी त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारु पिण्यासाठी बसला होता. याचदरम्यान हनुमान याने पीडित तरुणीला फोन करून जीआयपी डॅम परिसरात बोलावून घेतलं. यानंतर हनुमान याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

आरोपीच्या मित्रांकडूनही गँगरेप

यानंतर त्याचे मित्र विश्वास आणि जावेद यांनीही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर हादरलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांना तातडीने शोधून काढलं आणि बेड्या ठोकल्या.

या तिघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मध्यरात्री रस्त्यात वादावादी, वृद्धाकडून तरुणाची हत्या, संशय टाळण्यासाठी रात्रभर मृतदेहाजवळ झोपला

कानशिलात लागवल्याच्या रागातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी तरुणासोबत केलं असं काही की….; CCTV ने उलगडला घटनाक्रम

Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण