Nashik| पोलिस पुत्राचा खून वर्चस्वाच्या वादातून; 3 मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

| Updated on: Nov 22, 2021 | 5:51 PM

नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या पोलीस पुत्राच्या हत्येतील 3 मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे.

Nashik| पोलिस पुत्राचा खून वर्चस्वाच्या वादातून; 3 मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या पोलीस पुत्राच्या खुनातील 3 मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. मृत प्रवीण काकड याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्या वादातूनच हा खून झाल्याचे समजते.

मद्यपान करताना वार

काही दिवसांपूर्वी जामिनावरुन तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना पंचवटी परिसरात म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव लिंक रोडवर घडली होती. पोलिसांना रोहिणी हॉटेलच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली होती. प्रवीण काकड हा तरुण मित्रांसोबत रोहिणी हॉटेलजवळ मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन धारदार हत्याराने प्रवीणवर वार केले. या हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला होता.

गुन्हेगारी पार्श्वभूमी 

प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्याच्या मृतदेहाजवळ मद्याच्या बॉटल आढळून आल्या होत्या. मृत प्रवीणचे वडील नाशिक पोलीस खात्यात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच गणपत काकड पोलीस खात्यातून निवृत्त झाले होते. प्रवीणच्या खुनाने परिसरात खळबळ उडाली आहे.

तिघांना बेड्या

पोलीस पुत्र प्रवीण काकडच्या खुनाप्रकरणी तीन मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हा खून वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. प्रवीणही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याचे अनेकांशी खटके उडायचे. शिवाय तुझे वर्चस्व की माझे, या प्रकारातूनच मारेकऱ्यांना त्याचा पद्धतशीरपणे काटा काढल्याचे समजते. पोलिसांनी अजून तपास सुरू केला आहे.

इतर बातम्याः

नाशिकचे दिल्ली होऊ नये म्हणून प्रयत्न, प्रदूषणावर Go Green Cab चा उतारा; महिला उद्योजकांचा अनोखा उपक्रम

Nashik| शेतकऱ्यांचा महावितरण अभियंत्यांना 2 तास घेराव; अखेर कृषिमंत्र्यांकडून वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश

Nashik| भाजपची कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने, मालेगाव दंगलीचा नोंदवला निषेध, रझा अकादमीवर बंदीची मागणी