नाशिक शहर हादरलं! हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, हातात कोयता, गावठी कट्टा आणि… VIDEO

| Updated on: Mar 13, 2023 | 8:55 AM

पुण्यानंतर आता नाशिक शहरातही कोयता गॅंग दिसून येत आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

नाशिक शहर हादरलं! हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, हातात कोयता, गावठी कट्टा आणि... VIDEO
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात असलेला कोयता गॅंगचा पॅटर्न आता नाशिकमध्येही ( Nashik News ) रुजू लागला आहे. महिनाभरात तिसरी हल्ल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. सर्रासपणे हातात कोयता घेऊन हल्लेखोर दहशत माजवत आहे. नाशिकच्या नाशिकरोड परिसरात हल्ल्याची घटना होऊन काही तास उलटत नाही तोच पंचवटीत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून हल्लेखोरांनी हातात कोयता घेऊन हल्ला केला असून दुसरीकडे घरांवर दगडफेक केली आहे. याशिवाय कोणी दगडफेक केली म्हणून बाहेर आलेल्या महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. त्यात महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे.

हल्ल्याच्या दरम्यान एक धक्कादायक बाब म्हणजे कोयत्यांबरोबरच एकाच्या हातात बंदूक असल्याने त्याने गोळीबार केला आहे. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण हल्ल्याचे सीसीटीव्ही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

एकावर हल्ला करत असतांना एक महिला मध्ये आल्याने उषा महाले या महिलेला बंदुकीतून निघालेली गोळी स्पर्श करून गेली आहे. त्यामध्ये महिला जखमी झाली आहे. तर हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहे.

नाशिकच्या फुलेनगर परिसरात ही घटना घडली असून यापूर्वी याच भागात रात्रीच्या वेळेला हल्ल्याची घटना घडली होती. यामध्ये घराच्या दरवाज्यावर कोयत्याने वार करून घर पेटवून देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे शहरात हल्ल्याच्या घटना वाढतांना दिसून येत आहे.

रात्री आठ वाजेच्या दरम्यान कट्ट्यावर बसलेले असतांना दयानंद महाले यांचा मुलगा यांच्याशी काही जणांचा वाद झालेला होता. त्यानंतर त्या भांडनाची कुरापत काढून हल्लेखोरांनी कोयते आणि बंदूक घेऊन हल्ला केलाय.

यामध्ये 7 ते 8 जणांनी यावेळेला हल्ला करत असतांना महाले यांच्या पत्नी उषा महाले या मध्ये पडल्या होत्या, त्यामध्ये त्यांना स्पर्श करून गोळी गेली आहे. त्यात त्या जखमी असल्याचे समोर आले असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.