नांदेडच्या शंकर नागरी बँकेतील 14 कोटी हॅक, हुबळीतील तरुणी, युगांडा आणि केनियातील तरुणांना पकडलं

शंकर नागरी सहकारी बँकेच्या (Shankar Nagari Sahakari Bank Nanded) ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी तीन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

नांदेडच्या शंकर नागरी बँकेतील 14 कोटी हॅक, हुबळीतील तरुणी, युगांडा आणि केनियातील तरुणांना पकडलं
शंकर नागरी सहकारी बँक
| Updated on: Jan 30, 2021 | 12:59 PM

नांदेड : नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेच्या (Shankar Nagari Sahakari Bank Nanded) ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी तीन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेल्या खात्यातून तब्बल साडे चौदा कोटी रुपये लांबवले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने केनियातील दोन तर युगांडाच्या एकाला अटक केली आहे. या तिघांना कर्नाटकातील धारवाड इथून पकडलं. तर हुबळी इथल्या एका तरुणीला याच प्रकरणात अटक केली आहे. (Police arrested hackers of Shankar Nagari Sahakari Bank Nanded who robbed 14 crore)

ऑनलाईन पद्धतीने बँकेचे साडेचौदा कोटी रुपये या सर्वांनी लांबवले होते. त्याचा तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आला आहे. बँकेचे अकाऊंट हॅक करून आरोपींनी हा डल्ला मारला होता. मात्र नांदेड पोलिसांनी या सर्व आरोपींना गजाआड केलं आहे.

तब्बल 14 कोटींवर डल्ला

नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेतून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये रुपये संशयास्पदरित्या वळवण्यात आले होते. ही घटना 2 जानेवारी रोजी बँक व्यवस्थापनाला समजली. शंकर नागरी बँकेची शाखा नांदेड शहरातील आयडीबीआय बँकेजवळ आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार करुन या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली.

लाहोटी कॉम्प्लेक्समधील आयडीबीआय बँकेजवळ असलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेचे पैसे हॅकरने लुटले . NEFT आणि RTGS द्वारे बँकेला चुना लावण्यात आला. पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सायबर सेलकडून याघटनेची चौकशी करण्यात आली.

(Police arrested hackers of Shankar Nagari Sahakari Bank Nanded who robbed 14 crore)

संबंधित बातम्या 

नांदेडच्या बँकेत हॅकरचा दरोडा, 14 कोटी लुटले, तुमचे अकाऊंट चेक केलात?

Special Report | पुण्यात बसून 48 देशांमध्ये फ्रॉड, क्राईम ब्रांचकडून आफ्रिकन टोळीला बेड्या

Follow Us