Pune Crime | सायबर चोरट्यांचा तरुणाला गंडा ; 25 लाखांच्या लॉटरीच्या बदल्यात गमावले 47 लाख रुपये

| Updated on: Nov 18, 2021 | 3:24 PM

25 लाख रुपयांची लॉटरी मिळवण्यासाठी एका तरुणाची तब्बल 47 लाखांची फसवणूक सायबर  चोरट्यांनी केली आहे. बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर येथील 34 वर्षीय तरुणांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime | सायबर चोरट्यांचा तरुणाला गंडा ; 25 लाखांच्या लॉटरीच्या बदल्यात गमावले 47 लाख रुपये
Cyber crime,
Follow us on

पुणे- शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांचा सुळसुळाट झाला आहे. सायबर चोरी करताना गुन्हेगारांच्याकडून विविध फंडे अवलंबले जात आहेत. वाढदिवसाचे महागडे गिफ्ट, बँक खाते बंद केल्याच्या मेसेज करत लाखो रुपयांना गंडा घातल्यानंतर आता आणखी एका घटना उघडकी आली आहे. 25 लाख रुपयांची लॉटरी मिळवण्यासाठी एका तरुणाची तब्बल 47 लाखांची फसवणूक सायबर  चोरट्यांनी केली आहे. बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर येथील 34 वर्षीय तरुणांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

अशी केली फसवणूक
याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपींनी फोनद्वारे पीडिताला संपर्क साधत तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. त्या लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी कर म्हणून तुम्हाला काही शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी वेळोवेळी करणे, देत पीडित व्यक्तीला वेगवेगळ्या खात्यावर रक्कमा भरण्यास सांगितले. पीडित व्यक्तीनेही आपल्याला25 खांची लॉटरी लागली आहे या आनंदात चोरटे सांगतील त्याप्रमाणे रक्कम भरत गेले.

25 लाखांच्या लॉटरीसाठी पीडित व्यक्तीने वेळोवेळी जवळपास 47 लाख 35  हजारांची रक्कम चोरटयांना दिली होती. मात्र इतके पैसे भरूनही लॉटरीची रक्कम मिळत नसल्याने पीडित व्यक्तीने आरोपींकडे संपर्क साधला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत. संपर्क बंद केला. त्यानंतर आरोपीला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले व त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पुणे सायबर गुन्हे शाखेने हे प्रकरण बिबवेवाडी पोलिसांकडे वर्ग केले आहे.

पैश्यांच्या लोभामुळं होतेय फसवणूक
याप्रकरणी अनिल यादव , राहुल शर्मा, विनोद गुप्ता, विक्रम सिंग, पंकज कुमार , नितीन कुमारसह इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीची ही घटना साधारणपणे 22मे ते 20 ऑगस्टच्या 21 दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे करत आहेत.

गेल्या दोन आठवड्यातील सायबर गुन्ह्याची तिसरी घटना उघडकीस आली आहे. यांमध्ये जवळपास लाखो रुपयांवर चोरट्यांनी गंडा घातला आहे. वर्तमानपत्रे , वृत्त, वाहिन्यांमधून सातत्याने फसवणुकीच्या घटनाबद्दल माहिती होते. मात्र काही नागरिक हे पैशांच्या लोभापायी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात आपसूक अडकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!

मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी 22 नोव्हेंबरला दिल्लीत बैठक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

अवघ्या 400 रुपयांवरुन वाद, तरुणाला भोसकलं, अल्पवयीन तरुणासह पाच जण गजाआड