AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!

मालेगावमधील हिंसाचारानंतर रझा अकादमीचे अनेक कार्यकर्ते फरार आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!
crime
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 12:53 PM
Share

नाशिकः त्रिपुरातील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये हिंसाचार पेटला. यामागची पाळेमुळे खणून काढली जात आहेत. पोलिसांनी मालेगाव दंगलीप्रकरणी रझा अकदमीच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यात महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे समजते. हे पुरावे लवकरच न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. याप्रकरणीच्या मूळ सूत्रधाराचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. त्याला लवकर बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.

सूत्रधार कोण?

त्रिपुरा येथील कथित घटनेनंतर मालेगावमध्ये उसळलेला हिंसाचार सुनियोजित होता. त्याची एकेक कडी उलगडायला पोलीस यशस्वी ठरत आहेत. या हिंसाचाराला काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी फूस लावल्याचे समोर येत आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यासारखेच अजून अनेकजण असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे.

रझा अकादमीचे अनेक जण फरार

त्रिपुरा येथील कथित घटनेविरोधात मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला होता. या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांची कसून चौकशी सुरूय. त्यात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली होती. यात महत्त्वाचे कागदपत्रे मिळाले असून, ती कोर्टात सादर करणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे. सीसीटीव्हीचे चित्रण पाहून आरोपींचा शोध सुरू आहे. रझा अकादमीचे अनेक कार्यकर्ते फरार आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणी 52 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आमदारांचे आरोप

मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी मालेगाव दंगल सुनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे. मुंबईतून रझा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहे. सूत्रधारांचा शोध घ्या आणि त्यांना बेड्या ठोका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर बातम्याः

Nashik| लहानग्याला वाचवण्यासाठी थोरल्याची उडी, सख्खे भाऊ तळ्यात बुडाले, क्षणात होत्याचं नव्हतं!

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.