Nashik| लहानग्याला वाचवण्यासाठी थोरल्याची उडी, सख्खे भाऊ तळ्यात बुडाले, क्षणात होत्याचं नव्हतं!

11 वर्षांचा प्रणव शेततळ्यावर गेला. मात्र, त्याचा पाय घसरला. तोल गेला. त्यामुळे तो तळ्यात पडला. आपला लहान भाऊ शेततळ्यात पडल्याचे दिसताच 13 वर्षांच्या मोठ्या ओमने मागचा पुढचा विचार न करता उडी मारली.

Nashik| लहानग्याला वाचवण्यासाठी थोरल्याची उडी, सख्खे भाऊ तळ्यात बुडाले, क्षणात होत्याचं नव्हतं!
ओम आणि प्रणव तळेकर.
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 12:24 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या पाटे येथे सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची अतिशय ह्रदद्रावक घटना घडली आहे. ओम तळेकर आणि प्रणव तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच अख्ख्या गावात शोककळा पसरली. त्यांच्या आई-वडिलांच्या आकांताला पारावार नव्हता. हे पाहून उपस्थितही हेलावून गेले.

पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांना दोन मुले आहेत. त्यात ओम हा 13 वर्षांचा असून, तो इयत्ता सातवीच्या वर्गात शिकायचा. दुसरा मुलगा प्रणव. तो 11 वर्षांचा असून, तो पाचवीच्या वर्गात शिकायचा. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद आहेत. हे दोघे भाऊ घरातील शेळ्या शेतात चारायला घेऊन गेले होते. शेळ्या नाल्याजवळ गेल्या. तिथून जवळच पुढे शेततळे होते. त्यांनी शेततळ्याकडे पळ काढला. शेळ्यांना वळवायचे म्हणून लहान प्रणव शेततळ्यावर गेला. मात्र, त्याचा पाय घसरला. तोल गेला. त्यामुळे तो शेततळ्यात पडला. आपला लहान भाऊ शेततळ्यात पडल्याचे दिसताच मोठ्या ओमने मागचा पुढचा विचार न करता शेतळ्यात उडी मारली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दोन चपलांनी माग निघाला

शेतात चरायला सोडलेल्या शेळ्या दोन तासांनी शेतकरी संजय तळेकर यांच्या घरी पोहचल्या. मात्र, मुले आले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. गावात विचारले. शेवटी शेताकडे धाव घेतली. तेव्हा शेततळ्यावर आपल्या मुलांच्या दोन चपला त्यांना दिसल्या. त्यांनी गावातील नागरिकांना बोलावून घेतले. शेततळ्यात गळ टाकला. तेव्हा दोघा भावांचा मृतदेह मिळाला. या घटनेची माहिती चांदवड पोलीस ठाण्याला देण्यात आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबद्दल पाटेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आई-वडिलांचा आक्रोश

आपली दोन्ही मुळे शेततळ्यात बुडाल्याचे समजताच शेतकरी संजय तळेकर आणि त्यांच्या पत्नीने एकच आक्रोश सुरू केला. ही बातमी काही मिनिटांत पंचक्रोशीत पसरली. यावेळी शेतात पाटे गावातल्या गावकऱ्यांनी गर्दी केली. आई-वडिलांचा आकांत पाहून गावकरीही हेलावून गेले. एकाच कुटुंबातील दोन लहान मुले गेल्याने गावात हळहळ व्यक्त झाली. अनेक घरात चुलही पेटली नाही.

इतर बातम्याः

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती

Controversial Health Exam: तक्रारींच्या निराकरणानंतरच नियुक्त्या; आरोग्य मंत्र्यांचे आदेश

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.