पाच वर्षात तब्बल दहा हजार घटस्फोट, घटस्फोटाचे कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल…

| Updated on: Nov 15, 2022 | 2:03 PM

महाराष्ट्रात घटस्फोटाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंताजनक असून नाशिक शहरात 2018 ते ऑक्टोबर 2022 या पाच वर्षांच्या काळात 6 हजार 638 इतके घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत.

पाच वर्षात तब्बल दहा हजार घटस्फोट, घटस्फोटाचे कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल...
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : भारतीय समाज व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणून विवाह मानला जातो. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन आणि त्या बरोबरच दोन कुटुंब ही जोडले जातात. पण हेच दोन जिव किंवा कुटुंब विभक्त होण्यामागील विविध कारणे समोर येत असतांना नाशिकमधील घटस्फोटाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नाशिकमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले असून घटस्फोटाचे कारण ही धक्कादायक आहे. नाशिक सध्या घटस्फोटाच्या आकडेवारीवरुन चर्चेत आले असून पाच वर्षात दहा हजार घटस्फोट झाल्याचे उघडकीस आले असून ही आकडेवारी धक्कादायक आहे. लग्मामुळे दोन व्यक्तीचं आयुष्य बदलत असतं आयुष्याचा नवा प्रवास सुरू होत असतो पण हल्ली वाढलेलं हे घटस्फोटाचे प्रमाण तरुणाईसाठीच नाही तर अनेक कुटुंबासाठी चिंतेची बाब ठरत आहे. नाशिक शहरात घटस्फोटांची संख्या वाढत चालली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे 10 हजार 14 जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची बाब समोर आली आहे. याहून धक्कादायक म्हणजे दररोज 10 अर्ज दाखल होत असल्याचेही माहिती समोर आली.

महाराष्ट्रात घटस्फोटाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंताजनक असून नाशिक शहरात 2018 ते ऑक्टोबर 2022 या पाच वर्षांच्या काळात 6 हजार 638 इतके घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले.

त्यापैकी 5 हजार 460 दावे न्यायालयात निकाली निघाले या निकाली निघालेल्या दाव्यातील तब्बल 10 हजार 14 दाव्यातील जोडप्याचे घटस्फोट झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

तर फक्त एक हजार 974 जोडप्यांची मने जुळली असून घटस्फोटाच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. दररोज अंदाजे 13 ते 14 जोडपे न्यायालयात दावा दाखल करत आहे.

कोरोना काळात न्यायालयाचे कामकाज बंद होते, लॉकडाऊनमुळे दावेदार जिल्हा सोडू शकत नव्हते त्यामुळे कोरोनानंतर 21 – 22 साली घटस्फोटाच्या निकाली निघालेल्या दाव्यांची संख्या जास्त बघायला मिळते.

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल हे घटस्फोटामागे मुख्य कारण ठरत असून व्हॉटस ऍपसह ईतर सोशल मिडीयामुळे नवरा बायकोतील वाढत जाणारी भांडणं घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहे.

याशिवाय आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे कोरोना आर्थिक, कौटुंबिक वाद हे देखील यामागील कारणं आहेत. असून नोकरी जाणे आणि पगार कमी असणे ही देखील महत्वाची कारणे ठरत आहे.

नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयातील दाव्यांची स्थिती –

वर्ष         दाखल    निकाली   घटस्फोट    तडजोड
2018     1282     1050      1540           308
2019     1331      132         1715            324
2020    1144      656         2080         447
2021     1495     1223       327             472
2022    1386     1399       2352           423
एकूण – 6638     5460       10014         1974