Crime News: मद्यप्राशन केलेल्या तरुणांनी रस्ता अडवला, बाईक पेटवली, मारहाण केली, पण

| Updated on: Jan 09, 2023 | 2:43 PM

दारु पिलेल्या चौघांची तरुणाला बेदम मारहाण, बाईक पेटवली, मग...

Crime News: मद्यप्राशन केलेल्या तरुणांनी रस्ता अडवला, बाईक पेटवली, मारहाण केली, पण
बाईक पेटवली, मारहाण केली
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (UP) राज्यात क्राईमच्या (Crime News) रोज नव्या घटना उजेडात येतात. काल रात्री दारु पिलेल्या चौघांनी रस्ता अडवला होता. त्यावेळी एक तरुण तिथून बाईकवरुन घरी निघाला होता. त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यावेळी दारु पिलेल्या चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघांनी त्यांची बाईक सुध्दा पेटवली असल्याची तक्रार पोलिसांनी (UP Police) दिली आहे. तरुण नातेवाईकांकडे गेला होता, सायंकाळी घरी जात असताना ही घटना घडली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील हापूड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ज्यावेळी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी तो जोरजोरात ओरडू लागला. शेजारच्या लोकांनी त्या तरुणाला मदत केली असल्याची माहिती तरुणाने पोलिसांना सांगितली.

हे सुद्धा वाचा

मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राहूल आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या लोकांनी दारु पिलेल्या तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस ज्यावेळी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाबूगढ़ पुलिस चौघांची कसून चौकशी करीत आहे.