विवाहित मेहुणीला वश करण्यासाठी भावोजीची अर्ध्या रात्री तंत्र-मंत्राने पूजा, पत्नीला समजल्यानंतर तिने….

| Updated on: Mar 30, 2024 | 1:58 PM

2013 साली हिंदू पद्धतीने दोघांच लग्न झालेलं. दोघांना दोन मुलं आहेत. एक मुलगा 7 वर्षांचा, दुसरा 9 वर्षांचा आहे. लग्नानंतर 4 वर्ष सगळ व्यवस्थित सुरु होतं. 2017 मध्ये नवऱ्याने अचानक तांत्रिक विद्या शिकायला सुरुवात केली. त्यावरुन पती-पत्नीमध्ये भांडण व्हायची.

विवाहित मेहुणीला वश करण्यासाठी भावोजीची अर्ध्या रात्री तंत्र-मंत्राने पूजा, पत्नीला समजल्यानंतर तिने....
love affair
Follow us on

मेहुणीला वश करण्यासाठी एक व्यक्ती रात्री 12 वाजता तंत्र-मंत्राने पूजा सुरु करायचा. रात्री 2 पर्यंत पूजा आटोपल्यानंतर पत्नीला मारहाण करायचा. पत्नीच्या बहिणीच लग्न आरोपीच्याच छोट्या भावासोबत झालय. म्हणजे आरोपीची मेहुणी आणि वहिनी अशी दोन नाती त्या महिलेसोबत आहेत. रोजची तंत्र-मंत्राची पूजा आणि मारहाणीने हैराण झालेल्या महिलेने पोलीस आयुक्तांकडे न्याय मागितला. पोलीस आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण कौटुंबिक निवाडा केंद्राकडे पाठवलं. उत्तर प्रदेशच्या आगरामधील हे प्रकरण आहे.

सदर ठाणा क्षेत्रात राहणाऱ्या महिलेच लग्न जगदीशपुरा येथे राहणाऱ्या युवकासोबत झालं होतं. 2013 साली हिंदू पद्धतीने दोघांच लग्न झालेलं. दोघांना दोन मुलं आहेत. एक मुलगा 7 वर्षांचा, दुसरा 9 वर्षांचा आहे. लग्नानंतर 4 वर्ष सगळ व्यवस्थित सुरु होतं. 2017 मध्ये नवऱ्याने अचानक तांत्रिक विद्या शिकायला सुरुवात केली. त्यावरुन पती-पत्नीमध्ये भांडण व्हायची.

पत्नीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण….

माझ्या बहिणीला प्रेमात पाडण्यासाठी पती तंत्र-मंत्राचा आधार घेतो, असा पत्नीचा आरोप आहे. पत्नीने त्याला रोखल्यानंतर तो तिला मारहाण करायचा. 2020 साली पत्नीला मारहाण करुन तिला घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये माहेरी निघून गेल्यानंतर मी मध्ये-मध्ये सासरी यायची. पतीच्या वर्तनात कुठलीच सुधारणा दिसली नाही. म्हणून मी सासरी थांबली नाही, असं महिलेने कौटुंबिक निवाडा केंद्रात सांगितलं.

लहान बहिणीच लग्न नवऱ्याच्या छोट्या भावासोबत

रात्री 12 वाजल्यानंतर नवरा तंत्र-मंत्र सुरु करायचा. त्यानंतर अचानक मारहाण करायचा. आम्ही दोघी बहिणी असून माझ्या लहान बहिणीच लग्न नवऱ्याच्या छोट्या भावासोबत झालय असं महिलेने काऊन्सलरला सांगितलं.