सोशल मीडियावरून प्रेमात पडले, तरूणीने नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल केला अन्…

| Updated on: Apr 26, 2024 | 9:07 AM

लहान असोत वा थोर आजकाल बहुतांश लोकांना सोशल मीडियाची भुरळ पडलेली आहे. दिवसातला बराच वेळ सोशल मीडियावर घालवला जातो, मात्र हाच सोशल मीडियाचा वापर घातकही ठरू शकतो. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणाशी ओळख वाढवून, प्रेमात पाडून त्याची लाखोंची फसवणूक करण्यात आली.

सोशल मीडियावरून प्रेमात पडले, तरूणीने नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल केला अन्...
Follow us on

लहान असोत वा थोर आजकाल बहुतांश लोकांना सोशल मीडियाची भुरळ पडलेली आहे. दिवसातला बराच वेळ सोशल मीडियावर घालवला जातो, मात्र हाच सोशल मीडियाचा वापर घातकही ठरू शकतो. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणाशी ओळख वाढवून, प्रेमात पाडून त्याची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपमध्ये राहणाऱ्या तरूणाला एक तरूणीने फसवलं, ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर ओळख मग मैत्री

मिळालेल्या माहितीनुसार , पीडित तरूण हा 30 वर्षांचा असून तो एका खासगी कंपनीत काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याची सोशल मीडियावरून एका तरूणीशी ओळख झाली. दोघे एकमेकांशी गप्पा मारू लागले, हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांसोबत त्यांचे मोबाईल नंबरही शेअर केले होते. व्हिडीओ कॉल करून ते बराच वेळ गप्पा मारायचे. असेच काही दिवस गेले.

नको त्या अवस्थेत केला कॉल अन्..

काही दिवसांपूर्वी आरोपी तरूणीने त्या तरूणाला नग्न अवस्थे व्हिडीओ कॉल केला. तिने त्यालाही नग्न होण्यास सांगितले आणि त्याच्या नकळतच त्याचे शूटिंगही केले. मात्र थोड्या दिवसांनी त्या तरूणीने पीडित तरूणाला त्याचा तो व्हिडीओ पाठवला आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. झालेल्या प्रकारामुळे त्या तरूणाला धक्का बसला होता, मात्र तरीही त्याने पैसे देण्यास नकार दिले. तेव्हा तुझा हा व्हिडीओ व्हायरल करेन असे सांगत आरोपी तरूणीने त्याला धमकावण्यास सुरूवात केली. बदनामीच्या भीतीने त्या तरूणाने तिला 1 लाख 56 हजार रुपये दिले.

मात्र हा प्रकार इथेच थांबला नाही. त्या तरूणीची पैशांची मागणी वाढतच गेली. ती सतत त्याला ब्लॅकमेल करून पैसे मागायची. अखेर पीडित तरूण या ब्लॅकमेलिंगमुळे वैतागला आणि त्याने पंतनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून आरोपी तरूणीचा कसून शोध घेत आहेत. मात्र सोशल मीडियाचा वापर जपून करा, सतर्क रहा असे आवाहन या निमित्ताने पोलिसांनी नागरिकांना केले आहे.