Byju’s Group : बायजू ग्रुपने 1400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, वाचा सविस्तर…

| Updated on: Jul 01, 2022 | 3:53 PM

Byju's Group : 1400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं...

Byjus Group : बायजू ग्रुपने 1400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, वाचा सविस्तर...
Follow us on

मुंबई : ऑनलाइन लर्निंग कंपनी बायजूने 1400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एजुकेशन टेक्नॉलॉजी कंपनी (Byju’s Group’s Unit Topper) ने एका आठवड्यात 1100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांच्या जवळपास 36 टक्के आहे. या निर्णयामुळे अनेकांच नुकसान झालं आहे. तर व्हाईटहॅट ज्युनियरने (Whitehat Jr.) आपल्या 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. या दोन्ही कंपन्या बायजूने (Byju’s) मागच्या दोन वर्षांत विकत घेतल्या आहेत. “सोमवारी कंपनीकडून फोन आला आणि त्यांनी राजीनामा देण्यास सांगितलं. असं करायला नकार दिल्यास सूचना न देता नोकरीतून काढून टाकलं जाईल, अशी धमकी दिल्याचं या टॉपरच्या बडतर्फ कर्मचार्‍यांनी सांगितलं. शिवाय राजीनामा न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार मिळणार नाही”, असंही कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

1400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं

ऑनलाइन लर्निंग कंपनी बायजूने 1400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एजुकेशन टेक्नॉलॉजी कंपनीने एका आठवड्यात 1100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांच्या जवळपास 36 टक्के आहे. बायजूने गेल्या वर्षी जुलैमध्ये 150 दशलक्षमध्ये टॉपर विकत घेतलं. संपादन पूर्ण झाल्यानंतर टॉपरच्या विक्री आणि व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्‍यांना कायम ठेवण्यात आलं तर इतरांना जाण्यास सांगण्यात आलं आहे. हा इथल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे.

हे सुद्धा वाचा

राजीनामा देण्याचे आदेश

“सोमवारी कंपनीकडून फोन आला आणि त्यांनी राजीनामा देण्यास सांगितलं. असं करायला नकार दिल्यास सूचना न देता नोकरीतून काढून टाकलं जाईल, अशी धमकी दिल्याचं या टॉपरच्या बडतर्फ कर्मचार्‍यांनी सांगितलं. शिवाय राजीनामा न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार मिळणार नाही”, असंही कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. कंपनीतील एका शिक्षकाने सांगितलं की, “मी रसायनशास्त्र विषय शिकवतो. माझ्या सगळ्या टीमला काढून टाकण्यात आलं आहे. टॉपरने राजीनामा दिलेल्यांना एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन दिले. असं न करणाऱ्यांना कोणतेही वेतन दिले जाणार नाही, असं सांगितलं आहे.”