Nagpur School | मनपा आयुक्तांनी केले रामनगर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळेच्या पहिल्या दिवशी सदिच्छा भेट

पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाच्या बहुसंख्य नागरिकांच्या मागणीला अनुसरून सदर शाळेची मुहूर्तमेढ मागील वर्षी मनपाच्या माध्यमातून रोवण्यात आली. आकांक्षा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मनपा राबवित आहे. विनामूल्य दर्जेदार शिक्षणाचे स्वप्न त्यामुळे प्रत्यक्षात उतरले आहे. या शाळेत सध्या इंग्रजी माध्यमातील KG 1, KG 2 आणि यावर्षी इयत्ता पहिलीदेखील सुरु करण्यात आलेली आहे.

Nagpur School | मनपा आयुक्तांनी केले रामनगर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळेच्या पहिल्या दिवशी सदिच्छा भेट
मनपा आयुक्तांनी केले रामनगर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 1:58 PM

नागपूर : रामनगर येथील मनपा व आकांक्षा फाउंडेशनव्दारा संचालित इंग्रजी प्राथमिक शाळेला मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Radhakrishnan b.) यांनी बुधवारला शाळेच्या प्रथम दिनी भेट दिली. उन्हाळी सुट्ट्यांनंतर बुधवारी शाळेच्या प्रथम दिवशी मनपा आयुक्तांनी इंग्रजी माध्यम प्रथम इयत्तेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, गणवेश, पाठयपुस्तके देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (Education Officer) प्रीती मिश्रीकोटकर (Preeti Mishrikotkar), सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, कमलेश चव्हाण, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, शिक्षण विभाग समन्वयक विनय बगले, आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम चिमुकल्या विद्यार्थ्यांचे हस्ते आयुक्त तथा उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त व मनपाच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील इतर सोयी सुविधांचा आढावा देखील घेतला. यावेळी आयुक्तांनी शाळेची इमारत, खेळपट्टी व अन्य साधन सामुग्री अद्ययावत करणे यासंबंधी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा

पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाच्या बहुसंख्य नागरिकांच्या मागणीला अनुसरून सदर शाळेची मुहूर्तमेढ मागील वर्षी मनपाच्या माध्यमातून रोवण्यात आली. आकांक्षा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मनपा राबवित आहे. विनामूल्य दर्जेदार शिक्षणाचे स्वप्न त्यामुळे प्रत्यक्षात उतरले आहे. या शाळेत सध्या इंग्रजी माध्यमातील KG 1, KG 2 आणि यावर्षी इयत्ता पहिलीदेखील सुरु करण्यात आलेली आहे. वर्षागणिक इयत्ता दहावीपर्यंत वर्ग वाढविण्याचा मनपा प्रशासनाचा मानस आहे. आजघडीला नागपूर शहरातील विविध भागांत इंग्रजीच्या अश्या एकूण सहा शाळा सुरु आहेत. आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी व उपस्थित शिक्षक आणि मनपा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखण्याच्या सूचना देखील मनपा आयुक्तांनी केल्या.

शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम

शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरातील मनपा संचालित अन्य शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जयताळा माध्यमिक शाळा येथे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा येथे उपायुक्त (साप्रवि) निर्भय जैन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा येथे उपायुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम, दुर्गानगर माध्यमिक/प्राथमिक शाळा येथे उपायुक्त (घनकचरा व सार्वजनिक आरोग्य विभाग) डॉ. गजेंद्र महल्ले, लालबहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा येथे मुख्य अभियंता (बांधकाम) प्रदीप खवले, पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे संचालक (माहिती व तंत्रज्ञान) महेश धामेचा यांनी भेट दिली. त्यांना गणवेष व पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. या शाळांतील शैक्षणिक व अन्य सुविधांचा आढावा घेतला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.