Jalna Local Body Elections: जालन्यात भाजपच्या माजी आमदारांसमोर काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
जालन्यात भाजपच्या माजी आमदारांसमोर तिकीट नाकारल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी गोंधळ घातला. दुसरीकडे, अमरावतीत भाजपासोबत युती असतानाही रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने ४१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे युतीधर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राज्यातील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. जालन्यामध्ये तिकीट नाकारल्याने एका माजी नगरसेविकेने भाजपच्या माजी आमदारांसमोर गोंधळ घातला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी आपल्याला तिकीट नाकारल्याचा आरोप करत आपला निषेध व्यक्त केला. ‘आम्ही चालू रनिंग नगरसेवक आहोत, आमचं तिकीट कापल’ असे म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे जालन्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published on: Dec 30, 2025 06:06 PM
Latest Videos
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?

