Team India: ऋषभ पंत आणि इशान किशनपैकी वनडेत बेस्ट कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
Ishan Kishan vs Rishabh Pant : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर ऋषभ आणि इशान या दोघांपैकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सरस कोण आहे? हे जाणून घेऊयात.

बीसीसीआय निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटकडून टीम इंडियात काही बदल केले आहेत. तसेच येत्या काळात बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार संघ व्यवस्थापन दुसऱ्या विकेटकीपरच्या शोधात असल्याचं म्हटलं जात आहे. ऋषभ पंत, इशान किशन आणि ध्रुव जुरेल या तिघांच्या नावाची चर्चा आहे. पंत-इशानसमोर ध्रुव काही प्रमाणात पिछाडीवर आहे. ऋषभ आणि इशान या दोघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निमित्ताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेटकीपर ऋषभ आणि इशान या दोघांपैकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सरस कोण आहे? हे जाणून घेऊयात.
इशान किशनची आकडेवारी
इशान किशन 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियातून बाहेर आहे. इशानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात टीमला चॅम्पियन केलं. त्यानंतर आता इशान विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे इशान पंतच्या तुलनेत आता पुढे निघाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
इशानने आतापर्यंत 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.40 च्या सरासरीने एकूण 933 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे इशानने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. इशानने या दरम्यान 7 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच इशानचा एकदिवसीय कारकीर्दीतील स्ट्राईक रेट हा 102.19 असा आहे. इशान किशन याला आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इशानला न्यूझीलंड विरुद्ध जानेवारीत होणाऱ्या वनडे आणि टी 20i मालिकेसाठी स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.
