AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेने दिला सर्वात जास्त वजनाच्या बाळाला जन्म, पाहाताच आई-वडीलही झाले आश्चर्यचकीत…

Ajab Gajab: एका महिलेने सर्वात गुटगुटीत बाळाला जन्म दिला आहे.या कुटुंबाला आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना देखील या वजनदार बाळाला पाहुन आश्चर्य वाटले आहे.

महिलेने दिला सर्वात जास्त वजनाच्या बाळाला जन्म, पाहाताच आई-वडीलही झाले आश्चर्यचकीत...
heavy baby weight
| Updated on: Feb 27, 2026 | 5:18 PM
Share

सर्वसाधारणपणे मुले जन्माला येतात तेव्हा त्यांचे सरासरी वजन हे तीन किलोच्या आसपास असते. काही मुले ४ वा ४.५ किलोग्रॅम वजनाची असू शकतात. परंतू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक महिलेने एका अशा बाळाला जन्म दिला आहे त्याचे वजन सर्वसाधारण नवजात शिशुच्या वजनाच्या दुप्पट आहे. या बाळाला पाहून त्याचे आई-वडीलच नाही तर डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले. आईने देखील तिच्या सुदृढ बाळाला पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. शॉन ज्युनिअर नावाच्या या विशालकाय बाळाचा जन्म गेल्या ३१ जानेवारी रोजी कायूगा मेडिकल सेंटर येथे झाला. ज्याचे वजन ५.९ किलोग्रॅम ( १३ पाऊंड ) आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार मुलाचे आई-वडील टेरिका आणि शॉन यांनी म्हटले की त्यांना माहिती होते की त्यांचा मुलगा साईजमध्ये थोडा मोठा असेल, परंतू जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात त्याला पाहिले तर ते हैराण झाले. टेरिका यांनी म्हटले की आम्हाला माहिती होते की तो मोठा असेल. परंतू आम्ही इतका सृदृढ असेल अशी आशा केली नव्हती. जन्मताच हा मुलगा हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेला आतापर्यंतचा सर्वात जास्त वजनाचा मुलगा ठरला आहे.

चार मुलांची आई असलेली टेरिका हिने सांगितले की त्यांचा नवजात मुलगा आतापासूनच तीन ते सहा महिन्यांच्या मुलांचे कपडे आणि डायपर घालत आहे. असे वाटतंय की थेट तीन महिन्याच्या बाळाची आई बनलीय…हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सेसनी सांगितले की मुलाचा जन्म असामान्य होता. परंतू सर्वकाही ठीक झाले. हॉस्पिटलने नंतर फेसबुक हँडलवर या बाळाचा हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे, ज्यात शॉन ज्युनिअरसोबत एक आणखीन मार्गोट नावाची कन्या दाखविली असून तिचे वजन १.८ किलोग्रॅम होते. आणि तिचाही त्याच दिवशी जन्म झाला होता.

फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहिलेय की एका कुटुंबाने शॉन ज्युनिअरचे स्वागत केले आहे.जो रेकॉर्ड बनवणारा १३ पाऊंडचा नवजात शिशु आहे. जो रुग्णालयात जन्माला आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठे बाळ आहे.तर दुसऱ्या कुटुंबाने लहानग्या मार्गोटचे स्वागत केले आहे, जिचे वजन केवल ४ पाऊंड आहे. मार्गोटच्या आईने सांगितले की दोन्ही मुलांना एकसाथ पाहून आपला अनुभव खूपच खास झाला. ही गोष्ट गोड आठवण आहे, सर्वच मुले स्वत: अनोखी आणि खास असतात.

इतिहासातील सर्वात वजनी आणि उंच बाळ

इतिहासातील सर्वात जास्त वजनाचे आणि लांबीचे बाळ हे १९ जानेवारी १८७९ मध्ये अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सेविले शहरात झाला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मते जन्माच्या वेळी त्या नवजात बाळाचे वजन तब्बल ९.९८ किलोग्रॅम होते, त्याची लांबी जन्मताच २८ इंच ( ७१.१२ सेंटीमीटर ) होती. हे बाळ सर्वात जास्त वजनीच नव्हे तर सर्वात जास्त उंचीचे बाळ ठरले. मात्र, आपल्या असाधारण वजनामुळे हे बाळ केवळ दोन तासच जीवंत राहू शकले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...