AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग, विधान परिषदेत विरोधक आक्रमक, सरकारने काय सांगितलं?

Badlapur Case : बदलापूर मधील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. विरोधकांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर सरकारने या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला आहे.

बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग, विधान परिषदेत विरोधक आक्रमक, सरकारने काय सांगितलं?
Minister DesaiImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 27, 2026 | 5:39 PM
Share

बुधवारी (25 फेब्रुवारी) बदलापूर मधील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुरूवारी आरोपी जयेश मुने विरोधात पोस्को आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. हे प्रकरण सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चेचा विषय बनलं आहे. विरोधकांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर सरकारने या प्रकरणी कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बदलापूर प्रकरणावरून विरोधक आक्रमक

बदलापूर प्रकरणावर आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. सचिन अहिर म्हणाले की, ‘राज्यात विनयभंगाचा प्रकार वाढत चालला आहे. बदलापुरात लहान मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. स्कूल बसचे नियम जपण्याचे वेळोवेळी काम आपण करतो, तरीही एका इको गाडीमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे. बदलापुरात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करा. राज्यभरात असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहेत याची माहिती द्या.’ अशी मागणी केली. तसेच अनिल परब यांनी, ‘हा मुद्दा गंभीर आहे, यावर अल्पकालीन चर्चा तरी घ्यावी. प्रत्येक वेळेला हे होत आहे आणि अशा आरोपींना स्वीकृत नगरसेवक केले जाते असा आरोप केला. ‘ यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे.

सरकारने काय म्हटले ?

सचिन अहिर यांच्या मागणीवर बोलताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून ने-आण करण्यात येते, त्यासाठी एसओपी तयार करण्यात आली होती. आरटीओला काटेकोरपणे ते नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. बसमध्ये सीसीटीव्ही नसतील तर आजच पुन्हा एकदा सक्त सूचना आरटीओला देण्यात येतील. जे नियम पाळत नाहीत अशा वाहन चालकांवर आणि मालकांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच संस्थाचालकावर देखीलत्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

आरोपीला 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

बदलापूर विनयभंग प्रकरणातील आरोपी जयेश मुने वर पोस्को आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, बदलापूरमध्ये अवघ्या महिन्याभरात सलग दुसन्यांदा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...