AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा भंडाफोड! दलाल निघाली वेबसीरिजची अभिनेत्री, 2 अभिनेत्रींची सुटका

Thane Sex Racket Actress Arrest : अभिनय क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना पैशांच्या मोहात पाडून देहव्यापारात ढकलण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे

ठाण्यात हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा भंडाफोड! दलाल निघाली वेबसीरिजची अभिनेत्री, 2 अभिनेत्रींची सुटका
Thane Sex RacketImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 24, 2026 | 1:18 PM
Share

फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटाच्या मागे एक काळे सत्य लपलेले असते असे आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्या सारख्या शहरात हा प्रकार घडला आहे. अभिनय क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना पैशांच्या मोहात पाडून देहव्यापारात ढकलण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. ठाणे पोलिसांनी 26 वर्षीय एका हिंदी वेब सिरीज अभिनेत्रीला या प्रकरणी अटक केली आहे. ती स्वतः दलाली करत मुलींना या काळ्या धंद्यात ठकलत होती. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून, त्यापैकी एक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे.

पोलिसांनी कसा रचला जाळा?

ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक महिला जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून मुलींना देहव्यापारासाठी उपलब्ध करून देते. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी ‘बनावट ग्राहक’ पाठवले आणि आरोपी महिलेशी संपर्क साधला. आरोपीने “आमच्याकडे हिंदी वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुली उपलब्ध आहेत” असे सांगत काही फोटो पाठवले. व्यवहार ठरल्यानंतर ती दोन मुलींना घेऊन ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये आली. तेथे आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून तिला रंगेहाथ पकडले.

अभिनयातून देहव्यापाराकडे का वळली?

तपासात समोर आलेली माहिती अधिकच आश्चर्यचकीत करणारी आहे. अटक झालेली २६ वर्षीय तरुणी स्वतः हिंदी वेब सिरीजमध्ये अभिनय करते. ती मुंबईत भाड्याच्या घरात राहते. नियमित काम आणि पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने, घरखर्च, बहिणीचे शिक्षण, गावातील आई-वडिलांना पैसे पाठवणे आणि स्वतःच्या चैनीच्या सवयी पूर्ण करण्यासाठी तिने हा अवैध मार्ग निवडला. एका व्यक्तीच्या संपर्कात येऊन तिने हे रॅकेट सुरू केले.

पोलिसांची कारवाई

या कारवाईत 40 आणि 48 वर्षांच्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, रॅकेटमागे आणखी कोण सामील आहे का? याचा तपास सुरू आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...