AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे दिल्लीत असताना काँग्रेस नेते राहुल गांधींशी फोनवरून चर्चा केली. जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन, राहुल गांधींना झालेल्या अटकेसह नीट परीक्षा पेपरफुटीवर या दोघांमध्ये चर्चा झाली. केजरीवाल यांच्याशी भेटीनंतर, ठाकरे-गांधी यांच्यात नीट घोटाळ्यावर संसदेत एकजुटीने आवाज उठवण्यावर रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 22, 2026 | 2:13 PM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. काल त्यांनी अभिजीत दीपके आणि आंदोलकांशी चर्चा करून त्यांना संबोधित केलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. उद्धव ठाकरे आज दुपारीच मुंबईकडे यायला निघणार आहेत. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या कालच्या आंदोलनावरही त्यांच्याशी चर्चा केली.

उद्धव ठाकरे कालपासून दिल्लीत आहेत. दिल्लीतून मुंबईकडे निघण्यापूर्वी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांना पोलिसांनी अक्षरश: उचलून घेत पोलीस ठाण्यात नेलं होतं. रात्री उशिरा सोनिया गांधी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या या आंदोलनावर आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच नीट परीक्षा फुटीबाबत संसदेत एकत्रितपणे आवाज उठवण्याबाबातही यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच विरोधक म्हणून मुलांच्या मागे ताकदीने उभ राहील पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोनवरून सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

केजरीवाल- ठाकरे भेट

दरम्यान, आज आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जंतरमंतरवरील आंदोलन आणि देशातील इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली. 2024 मध्ये नीटची परीक्षा झाली होती. त्यावेळी पेपर लिक झाला होता. त्या प्रकरणातील मास्टर माइंडची वेळेवर चार्जशीट दाखल केली नाही. जे चोर आहेत. त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली जात नाही. त्यांना ऑटोमॅटिक बेल मिळेल अशा पद्धतीने वागत आहेत आणि म्हणता आम्ही परीक्षा पद्धतीवर काम करत आहोत? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.

लोकांचं ऐका…

मी उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो होतो. देशात जे आंदोलन सुरु आहे, यावर सविस्तर चर्चा झाली. सध्याची परिस्थिती भयानक आहे. हे विद्यार्थी आहेत. देशाचं भविष्य आहेत. त्यांच्यावर अमानुष लाठीमार करू नका. त्यांच्याशी असं वागू नका, असं मी सरकारला सांगितलं. आम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले. भोपाळचा एक विद्यार्थी बघितला. तो स्वतः डबा घेऊन इकडे आला आहे. पूर्ण जनपथ भरलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यातुन विद्यार्थी येत आहेत. शिक्षण व्यवस्थेत खूप गोंधळ आहे. लोकांना समाधान मिळालं नाही, त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांना रोखण्याचं काम करू नका. लोकांचं म्हणणं ऐका. फायद्याचं राहील, असा सल्लाही केजरीवाल यांनी दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...