AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest LIVE : वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

| Edited By: | Updated on: Jul 23, 2026 | 7:02 AM
Share

CJP Protest Delhi LIVE Updates in Marathi : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन दिल्लीत सुरू आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाला तरीही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

CJP Protest LIVE : वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक
CJP DELHI PROTESTImage Credit source: tv9 marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Jul 2026 07:02 AM (IST)

    वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

    वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बंदची हाक दिली आहे.

  • 22 Jul 2026 08:57 PM (IST)

    सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची चौकशी केली, त्यांच्या पत्राला उत्तर दिले- जेपी नड्डा

    आम्ही सोनम वांगचूक यांची भेट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या प्रकृतीविषयी आम्ही चौकशी केली. तसेच त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतही आम्ही त्यांना केली. त्यावर मी तुमच्याशी पत्रव्यवहार करतो, असे सांगितले. आता त्यांनी आम्हाला खुले पत्र लिहिले आहे. त्यावर आम्ही उत्तर दिले.

  • 22 Jul 2026 08:56 PM (IST)

    विरोधकांना जेवढा वेळ चर्चा करायची आहे, त्यांनी करावी, आम्ही तयार- जेपी नड्डा

    विरोधकांना जेवढा वेळ चर्चा करायची आहे, त्यांनी करावी. आम्ही त्यासाठी तयार आहोत. विरोधकांनी त्यासाठी वेळ ठरवावी. आम्ही कोणावरही आरोप करत नाहीयेत, अशी भूमिका यावेळी जेपी नड्डा यांनी मांडली.

  • 22 Jul 2026 08:51 PM (IST)

    दिल्लीतील आंदोलनाचे राजकारण करू नका, जेपी नड्डा यांचा हल्लाबोल

    केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिल्लीतील आंदोलनाचे राजकारण करू नका, असे आवाहन केले. तसेच ज्या ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्या त्या राज्यात किती पेपर लीक झाले, याची यादीच जेपी नड्डा यांनी समोर आणली.

  • 22 Jul 2026 07:59 PM (IST)

    जेपी नड्डा यांची पत्रकार परिषद, काय बोलणार याकडे लक्ष

    केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हे रात्री साडे आठ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. एकीकडे सीजेपीचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे नड्डा नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ते सीजेपीच्या मागण्यांवरही काय भाष्य करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 22 Jul 2026 06:45 PM (IST)

    आदित्य ठाकरे, अमित ठाकरे शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीला

    आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्कातील आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला गेले आहेत. सीजेपीच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरू आहे. आदि्य ठाकरे यांनी यावेळी तरुण आंदोलकांना संबोधित केले.

  • 22 Jul 2026 06:16 PM (IST)

    राज ठाकरे हे शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीला

    राज ठाकरे हे शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीला गेले आहेत. एकूण दहा जणांनी मला भेटायला या. आपण चर्चा करू, अस राज ठाकरे यांनी आंदोलकांना सांगितले आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले जात आहे.

  • 22 Jul 2026 06:02 PM (IST)

    पोलीस माझ्या कानात कुजबुजत होते, सरकार हटवा: राहुल गांधी

    राहुल गांधी मते, काल पोलीस त्यांना हे सरकार हटवायला सांगत होते. एक पोलीस म्हणाला, “आम्हाला आदेश पाळावे लागतात.” आपण गुन्हा करत आहोत हे पोलिसांना माहीत होते.

  • 22 Jul 2026 05:49 PM (IST)

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे उद्या करणार मौन आंदोलन

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे उद्या करणार मौन आंदोलन करणार आहेत. सकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलन असणार आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अण्णांची मागणी आहे.  आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक “नगरचे जंतर मंतर” असे नाव देणार आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • 22 Jul 2026 05:42 PM (IST)

    दादरमधील शिवसेना भवन परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन

    दादरमधील शिवसेना भवन परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी आंदोलन करत आहे. पाऊस पडत असूनही विद्यार्थ्यांनी आंदोलनावर ठाम आहेत.

  • 22 Jul 2026 05:29 PM (IST)

    नागपुरात भाजपच्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    नागपुरात भाजपच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयात जाण्याचा प्रयत्न होता. राहुल गांधींविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात ठिकठिकाणी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

  • 22 Jul 2026 05:21 PM (IST)

    सोनम वांगचूक यांचं जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना पत्र

    सोनम वांगचूक यांनी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना पत्र लिहून मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका असं पत्रातून सांगितलं आहे. सरकारने आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेईल, असं सोनम वांगचूक यांनी सांगितलं आहे.

  • 22 Jul 2026 05:12 PM (IST)

    राज्यातही मोठं आंदोलन करण्याची ठाकरेसेना आणि काँग्रेसची तयारी

    उद्धव ठाकरे यांनी फोनवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा केली आहे. राज्यात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात ही चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाटी राज्यात विरोधक मैदानात उतरणार आहेत. राज्यातही मोठं आंदोलन करण्याची ठाकरेसेना आणि काँग्रेसची तयारी आहे.

  • 22 Jul 2026 05:09 PM (IST)

    सरकारने देशातील रोजगाराच्या संधीही नष्ट केल्या आहेत: राहुल गांधी

    राहुल गांधी म्हणाले की, देशात सरकारी नोकरीच्या अर्जांची गळती होत आहे. सरकारने देशातील रोजगाराच्या संधीही नष्ट केल्या आहेत. जेव्हा विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो.

  • 22 Jul 2026 04:57 PM (IST)

    राहुल गांधींनी केलेल्या तीन मागण्या काय?

    धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यांनी पायउतार झालं पाहिजे ही राहुल गांधींची पहिली मागणी आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे, ही दुसरी मागणी राहुल गांधींनी केली. तसेच,  मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी तिसरी मागणी गांधी यांनी केली.

  • 22 Jul 2026 04:37 PM (IST)

    विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, राहुल गांधींचा गंभीर आरोप

    नीट परीक्षेवर होणारा खर्च एकूण शिक्षणाच्या तोडीचा आहे. १.३२ कोटी रुपये विद्यार्थी नीट वर खर्च करतात. १.३ लाख कोटी रुपये हा शैक्षणिक बजेट आहे. तरीही पेपर लीक होत आहेत. विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

  • 22 Jul 2026 04:35 PM (IST)

    दिल्लीतील आंदोलनात पोलिसांकडून मुलींना मारहाण, राहुल गांधींनी दाखवले व्हिडिओ

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत आज लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुलींना पोलीस कशा पद्धतीने मारहाण करत आहेत, त्याचे व्हिडीओ दाखवले. बंदुकीने फायर करण्यात आल्याचंही दाखवलं. एका तरुणाच्या अंगावर बंदुकीचे छर्रे लागल्याचं दिसतं आहे.

  • 22 Jul 2026 04:26 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने

    छत्रपती संभाजीनगर शहरात आज काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयाबाहेर भाजपाने जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपाने हे आंदोलन छेडले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने गांधी भवन परिसरात जमले आणि रघुपती राघव राजाराम चा जयघोष केला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  • 22 Jul 2026 04:12 PM (IST)

    जळगाव : जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

    दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात काव्यरत्नावली चौकात विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

  • 22 Jul 2026 02:42 PM (IST)

    भाजप आक्रमक, मुंबईत साटम यांच्या नेतृत्वात राहुल गांधींविरोधात आंदोलन

    मंगळवारी राहुला गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहे आंदोलन केलं होतं, या आंदोलनानंतर आता देशभरात वातावरण तापलं आहे, राहुल गांधी यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे.

  • 22 Jul 2026 02:32 PM (IST)

    चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, पोलिसांकडून धडपकड

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं असून, या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये देखील विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून, पोलिसांनी या ठिकाणी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे.

  • 22 Jul 2026 02:17 PM (IST)

    आज 4 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद

    मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं होतं, त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तब्बल तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली, दरम्यान आज आता सायंकाळी चार वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत, राहुल गांधी काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

  • 22 Jul 2026 01:56 PM (IST)

    CJPच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

    कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसने आंदोलन केले आहे. राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

  • 22 Jul 2026 01:55 PM (IST)

    23 जुलै 2026 रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांना सुट्टी नाही

    23 जुलै 2026 रोजी शाळांना सुट्टी लागण्याबाबत सोशल मीडिया चर्चा सुरु आहे. आता निवेदन जारी करुन स्पष्ट केले आहे की, 23 जुलै 2026 रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करणारा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.

  • 22 Jul 2026 01:45 PM (IST)

    मुंबईत आज संध्याकाळी मोठी भरती येण्याची शक्यता

    मुंबईत आज संध्याकाळी 5.30 वाजता समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. समुद्रात 3.32 मीटर उंच लाटा उसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशारा.

  • 22 Jul 2026 01:30 PM (IST)

    गोरेगावमध्ये स्कायवॉकवरील पत्रे वाऱ्यामुळे निखळले

    गोरेगावमध्ये स्कायवॉकवरील पत्रे वाऱ्यामुळे निखळल्याचे चित्र दिसत आहे. नेस्को आणि महानंदा डेअरीला जोडणाऱ्या स्कायवॉकवरील पत्रे उडाल्याचे दिसत आहे.

  • 22 Jul 2026 01:20 PM (IST)

    बैठकीसाठी कोणत्याही नेत्याच्या घरी जाणार नाही- सौरव दास

    कॉकरोच जनता पार्टीने सरकारसोबत चर्चेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. बैठकीसाठी कोणत्याही नेत्याच्या घरी जाणार नाही. जंतर मंतरवर बैठक झाली पाहिजे असे सौरव दास यांनी म्हटले आहे.

  • 22 Jul 2026 01:15 PM (IST)

    उद्धव ठाकरे राहुल गांधीशी फोनवर करणार चर्चा

    जंतर मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता उद्धव ठाकरे राहुल गांधींशी फोनवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 22 Jul 2026 01:09 PM (IST)

    30 जुलै रोजी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार

    शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 30 जुलै रोजी घोषित होईल,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी खुश आहेत. 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असून ज्यांनी नियमित कर्ज भरला आहे, त्यांना प्रोत्साहन अनुदान देखील मिळेल,असेही मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केला आहे.

  • 22 Jul 2026 12:55 PM (IST)

    जेवढं थांबवण्याचा प्रयत्न कराल, आंदोलन तितकंच वाढेल- अरविंद केजरीवाल

    “विद्यार्थ्यांवर अत्यंत वाईट पद्धतीने लाठीचार्ज झाला. केंद्रीय शिक्षणमंत्री राजीनामा का देत नाहीयेत? सरकारने विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायला हवं. जेवढं थांबवण्याचा प्रयत्न कराल, आंदोलन तितकंच वाढेल. लोकांचं म्हणणं ऐकलं तर सरकार फायद्यात राहील,” असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं.

  • 22 Jul 2026 12:51 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

    अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “देशातील सद्यपरिस्थितीवर ठाकरेंसोबत चर्चा झाली. जंतरमंतरवरील आंदोलनासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली. अनेक विद्यार्थी घर सोडून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. देशभरातील लोक दिल्लीत येत आहेत, आंदोलन करत आहेत.”

  • 22 Jul 2026 12:37 PM (IST)

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आंदोलकांसह विरोधकांकडूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार सभागृहात चर्चेस तयार आहे.

  • 22 Jul 2026 12:33 PM (IST)

    गोरगरिबांच्या लेकरांचे मुडदे पाडण्याचं काम सरकार करतंय- मनोज जरांगे

    “लाठीचार्ज झाला आणि देश विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभा राहिला. गोरगरिबांच्या लेकरांचे मुडदे पाडण्याचं काम सरकार करतंय. पुन्हा लाठीचार्ज केला तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. पक्ष बघू नका, तर लेकरं बघा,” असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 22 Jul 2026 12:26 PM (IST)

    काही झालं तरी जंतरमंतरवरील जागा सोडू नका- मनोज जरांगे

    काही झालं तरी जंतरमंतरवरील जागा सोडू नका. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सर्व राज्य आणि देश विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मनोज जरांगे यांनी अभिजीत दीपिके यांची भेट घेतली आहे.

  • 22 Jul 2026 12:21 PM (IST)

    सरकार चर्चा करण्यास पूर्णपणे तयार, चर्चा नियमांनुसारच व्हावी- किरेन रिजिजू

    लोकसभेत बोलताना मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून आम्ही सांगत आहोत की, ‘नीट’ (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. पहिल्या दिवसापासून आमची हीच भूमिका आहे की, चर्चा नियमांनुसारच झाली पाहिजे. चर्चा कधी होणार, तिचा कालावधी किती असेल आणि ती कोणत्या नियमांतर्गत घेतली जाईल, हे सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून ठरवलं जावं. ‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे.”

  • 22 Jul 2026 12:15 PM (IST)

    मनोज जरांगे जंतरमंतरवर; अभिजीत दीपकेंशी चर्चा

    मनोज जरांगे दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी पोहोचले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंशी ते चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे.

  • 22 Jul 2026 12:12 PM (IST)

    जेपी नड्डा CJP च्या नेत्यांशी करणार चर्चा

    केंद्रीय मंत्री जेपी नड्डा थोड्याच वेळात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांची भेट घेणार आहेत. नड्डा सीजेपीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

  • 22 Jul 2026 12:09 PM (IST)

    दिल्लीतील ही मेट्रो स्थानकं बंद, इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहतील

    लोककल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवातीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, ITO, दिल्ली गेट, इंद्राखान, मार्केट शिवाजी स्टेडियम ही दिल्लीतील मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. मात्र राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट इथं इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहतील.

  • 22 Jul 2026 12:06 PM (IST)

    दिल्ली मेट्रोची सोळा स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

    दिल्ली मेट्रोची सोळा स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. यापैकी बहुतेक स्थानकं ब्लू लाईनवरील आहेत.

  • 22 Jul 2026 11:53 AM (IST)

    ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

    ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे. तर दोन आठवड्यात या नोटीसचं उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

  • 22 Jul 2026 11:50 AM (IST)

    शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या बैठकीवर अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया

    “आज शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तर या भेटीत ते आमच्या मुद्यावर ते नक्कीच भाष्य करतील. ज्या ज्या मुलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या पोलिसांची चौकशी करावी आणि ज्या ज्या मुलांवर तक्रार नोंदवली आहे त्या सगळ्या मुलांना सोडावं. सुप्रियाताईंशी चर्चा झाली होती ते आमच्यासोबत आहेत.” असं अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.

  • 22 Jul 2026 11:45 AM (IST)

    शरद पवार, सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीवर आता शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली

    मला वाटत आहे की पवारसाहेह हे जंतरमंतरवर काल अभिजीत दिपके यांना काल भेटले होते. तर विद्यार्थ्यांचे जे 22 दिवसांपासून चालेल्या आंदोलनाला मार्ग काढण्यासाठी त्यांनी मोंदी यांची भेट घेतली असावी असं शशिकांत शिंदे नी म्हटले आहे.

  • 22 Jul 2026 11:41 AM (IST)

    CJP च्या आंदोलनाचा मुद्दा शरद पवारांनी मोंदी यांच्याकडे मांडला-सूत्रांकडून माहिती समोर

    CJP च्या आंदोलनाचा मुद्दा शरद पवारांनी मोंदी यांच्याकडे मांडला. विद्यार्थ्यांचा मुद्दा शरद पवार यांनी मोंदी यांच्यकडे मांडला तर पेपर फुटी संदर्भात काय उपाययोजना करता येईल ही चर्चा बैठकीत झाली अशी माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे.

  • 22 Jul 2026 11:36 AM (IST)

    शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

    शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, काल शरद पवार यांनी जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीची फोटो आता समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

  • 22 Jul 2026 11:29 AM (IST)

    सरकार नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत चर्चेस तयार

    मंत्री किरन रिजीजू लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीला. सरकार नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत चर्चेस तयार आहेत. तर दुपारी 12 वाजता चर्चेस तयार असल्याची घोषणा होण्याची शक्यता. संसद भवनात गोयल आणि नड्डा यांची बैठक सुरु आहे.

  • 22 Jul 2026 11:23 AM (IST)

    दिल्लीतील जंतरमंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सुप्रिम कोर्टात याचिका

    दिल्लीतील जंतरमंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता लाठीचार्ज प्रकरणातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

  • 22 Jul 2026 11:20 AM (IST)

    क्रेंद्रीय मंत्री आज CJP च्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची शक्यता

    क्रेंद्रीय मंत्री आज CJP च्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 20 जुलैला चर्चा झाली होती. ही चर्चा फक्त 20 मिनिटेच झाली होती. तर आता पुन्हा आज चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 22 Jul 2026 11:16 AM (IST)

    नागपूरात राजभवनासमोर काँग्रेसचे आंदोलन

    नागपूरात राजभवनासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरु आहे. नागपूरमध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड सुरु आहे.

  • 22 Jul 2026 11:12 AM (IST)

    महादेव जानकर, राजू शेट्टी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलकाच्या भेटीसाठी पोहोचले

    राजू शेट्टी, महादेव जानकर हे आता दिल्ली जंतर मतंरवर पोहोचले आहे. मारहाण केलेल्या आंदोलकांती ते भेट घेत आहेत. यावेळी जानकर म्हणाले की, “या मुलांना एवढं मारलं आहे की ते तीन दिवस झाले जेवण करत नाहीये. आता हे सरकार पलटी करण्याची वेळ आली आहे. ही जी हुकुमशाही सुरु आहे ही फार वाईट आहे आणि समाज पक्ष याचा निषेध करत आहेत.”

  • 22 Jul 2026 11:06 AM (IST)

    प्रियंका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

    “विद्यार्थ्यांच्यी समस्या ही खरी आहे. विद्यार्थ्यांनी म्हटले आहे फक्त आमच्याशी चर्चा करा. ही जी काही व्यवस्था आहे ती सुधारा. ही जाी व्यवस्था आहे ती तुटलेली आहे. सगळ्यांना माहित आहे की तुटलेली सिस्टम आहे. ज्यांची मुले आहेत त्यांच्या पालकांचा माहित आहेत त्यांच्यावर काय परिस्थिती आहे” ती असं प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

  • 22 Jul 2026 10:53 AM (IST)

    CJP ला पाठिंबा, नागपूर, पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

    नागपूर, पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, CJP ला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.  पोलिसांकडून नागपूरमधील राजभवन परिसरातील आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  पुण्यात लोकभवनासमोर काँग्रेसकडून आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

  • 22 Jul 2026 10:41 AM (IST)

    ‘मन की बात’ नको ‘जन की बात’ ऐका – उद्धव ठाकरे

    ‘मन की बात’ नको ‘जन की बात’ ऐका. सरकार ‘जन की बात’ ऐकत नसेल तर  ही लोकशाही नाही. विद्यार्थ्यांशी जाऊन बोलण्यात कमीपणा कसला वाटतो – उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

  • 22 Jul 2026 10:35 AM (IST)

    या सरकारपेक्षा इंग्रज चांगले होते – उद्धव ठाकरे

    या सरकारपेक्षा इंग्रज चांगले होते. मोदी, शहांच्या डोक्यात हवा गेली आहे, ती काढायला  वेळ लागत नाही. सरकारने चर्चा करायला हवी होती – उद्धव ठाकरे

  • 22 Jul 2026 10:34 AM (IST)

    पहिल्या दिवसापासूनच माझा आंदोलनाला पाठिंबा – उद्धव ठाकरे

    मी पहिल्या दिवसापासून या आंदोलकांसोबत आहे. पहिल्या दिवसापासूनच माझा आंदोलनाला पाठिंबा. काल जंतरमंतरवर मी या आंदोलकांची भेट घेतली. आज जे सत्तेत आहे, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे – उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका.

  • 22 Jul 2026 10:29 AM (IST)

    आईस्क्रीम न दिल्याने कांदिवलीमध्ये दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण

    कांदिवली लोखंडवाला परिसरात भयानक घटना घडली आहे.  ग्राहकाने मागितलेलं आईस्क्रीम न दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. घटनेचा CCTV फुटेज समोर आल्यानंतर समता नगर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 22 Jul 2026 10:17 AM (IST)

    नाशिकमध्ये स्कूलबस खड्ड्यात अडकली, अनेक विद्यार्थ्यांची सुटका

    नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस खड्ड्यात अडकली. नाशिक- धात्रक फाटा परिसरात ही घटना घडली. अर्धा ते पाऊण तास ही बस खड्ड्यात अडकून पडली होती.  स्थानिक नगरसेवक आणि इतर रहिवाशांनी या बसला बाहेर काढलं.  30 ते 40 विद्यार्थ्यांची सुटका सुखरूपपणे करण्यात आली. सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही.

  • 22 Jul 2026 10:12 AM (IST)

    अजित पवारांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचं ट्विट

    अजित पवारांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे.  महाराष्ट्राच्या विकासात अजितदादाचं योगदान उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • 22 Jul 2026 10:04 AM (IST)

    कल्याणहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड

    कल्याणहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड झाला आहे. दरवाजे बंद पडल्याने एकाच गेटवर प्रवाशांची झुंबड उडाल्याचं पहायला मिळालं. एकाच प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती देखील निर्माण झाली आहे.लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ झाली. अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून दरवाजा बंद केल्यावर ही लोकल पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

  • 22 Jul 2026 09:47 AM (IST)

    आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल

    आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून चंद्रभागा नदीला पाणी आल्याने नदीपात्रात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि बुडणाऱ्या भाविकांचे जीव वाचवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. चंद्रभागा नदीपात्रात 17 बचाव बोटी आणि 230 प्रशिक्षित जवान रात्रंदिवस गस्त घालत आहेत. यामध्ये एनडीआरएफचे जवानही सहभागी असून नदीत उतरणाऱ्या प्रत्येक भाविकावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

  • 22 Jul 2026 09:38 AM (IST)

    राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप करणार आंदोलन

    राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. तर आज भाजप राहुल गांधी यांच्या आंदोलनाला उत्तर देणार आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर देखील भाजप आंदोलन करणार आहे…

  • 22 Jul 2026 09:35 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात.

    छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे सुकून जात असलेल्या पिकांना मिळाली नवसंजीवनी आहे. बळीराजा सुखावला मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यात सरासरी 80 टक्के पेरण्या पूर्ण, रखडलेल्या पेरणीच्या कामाला पावसामुळे वेग येणार आहे.

  • 22 Jul 2026 09:25 AM (IST)

    काळपासून पावसाने चांगलीच हजेरी ठाण्यात लावली

    ठाण्यातील कोपरी परिसरातील बारा बंगला या ठिकाणी सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास अडचण निर्माण होत आहे. ठाणे महानगरपालिकेकडून लावण्यात आलेला सक्षम पंप ठिकाणी एकही कर्मचारी कार्यरत नाही…त्यामुळे सक्षम पंप बंद असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.

  • 22 Jul 2026 09:17 AM (IST)

    निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; पशुपालकांची वाढली डोकेदुखी

    निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; पशुपालकांसाठी वाढती डोकेदुखी ठरली आहे.  देवगावच्या शेतकऱ्याने कर्ज काढून बंदिस्त गोठा उभारला, गोठ्यात गायींसाठी पंख्यांची व्यवस्था करण्यात आली.  गोठ्यात हवा खेळती राहिल्याने गायीचे आरोग्य सुधारले, २५ गायींपासून दररोज २५० लिटर दूध उत्पादन होत आहे. बट्याच्या धोक्यात आधुनिक बंदिस्त गोठा पशुपालकांसाठी वरदान ठरतोय.

  • 22 Jul 2026 08:50 AM (IST)

    भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

    नाशिक विधान परिषद निवडणुकीतील कथित पैशांच्या वाटपाची भारत निवडणूक आयोगाने घेतली दखल. तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला दिले आदेश. नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते यांच्यात झाली होती लढत. महायुतीकडे बहुमत असताना देखील गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा केला होता पराभव

  • 22 Jul 2026 08:40 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार; अधूनमधून जोरदार सरी

    कल्याण-डोंबिवलीत काल दुपारपासून पावसाचा ये-जा सुरूच, आजही सकाळ पासून ढगाळ वातावरण सह पावसाची संततधार कायम. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना. मात्र पावसाचा वेग कमी होताच पाण्याचा निचरा जलद गतीने होताना दिसत आहे. हवामान विभागाकडून पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

  • 22 Jul 2026 08:30 AM (IST)

    मुंबई उपनगरात पुन्हा मान्सूनची हजेरी, अनेक भागात पाऊस

    मुंबई उपनगरात मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. काल रात्री उशिरापासून कांदिवली, बोरीवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव आणि दहिसर परिसरात पाऊस सुरू आहे. हा टॉप अँगलचा व्हिडिओ कांदिवली परिसरातील आहे. येथे आकाशात काळे दाट ढग जमा झाले आहेत आणि सतत पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • 22 Jul 2026 08:25 AM (IST)

    गोंदियात संततधार पाऊस….

    गोंदिया जिल्ह्यात काल संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे…. या पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फायदा होत असून रोहिणीच्या वाढीला वेग आला आहे… मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे….. त्यामुळे शेतकरी समाधानी असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त करत आहेत…. हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे……

  • 22 Jul 2026 08:20 AM (IST)

    चॉपरचा धाक दाखवत तरुणावर जीवघेणा हल्ला

    नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-१९ येथील योगिता मेडिकलजवळ शिवसेना शाखेसमोर रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन तरुणांनी तलवार व चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात वाद मिटविण्यासाठी पुढे आलेल्या पीडिताच्या आईलाही डोक्यात मारहाण करण्यात आली.

  • 22 Jul 2026 08:15 AM (IST)

    रात्रभर पाऊस तरीही आंदोलकांनी सोडले नाही जंतर मंतर

    नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन सुरू आहे. देशभरातून तरूण या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. काल अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलकांची भेट घेतली. यादरम्यानच रात्रभर पाऊस झाला तरीही आंदोलकांनी जंतर मंतर सोडले नाही.

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून हे आंदोलन अधिक चर्चेत आले. संसदेवर थेट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम आहेत. राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस सुरू आहे. आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. दिल्लीतील नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सरकारवर टीका केली जात आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्र आणि इतरही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Published On - Jul 22,2026 8:13 AM

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...