हे झाड घराच्या आसपास लावूच नका, सापांचं जणू दुसरं घरच, कायम असतो डेरा
सापांबद्दल सर्वांच्याच मनात एक प्रकारची भीती असते. पावसाळ्याच्या काळात तर सापांचा जमिनीवरील वावर मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेकदा तुमच्या आजू-बाजूला साप आढळून येतात. त्यामुळे या काळात अधिक सावध असणं गरजेचं असतं.

सापांबद्दल कायमच सर्वांना भीती वाटत असते, मात्र दुसरीकडे साप हा अनेकांच्या आकर्षणाचा देखील विषय असतो. सापांबद्दल माहिती जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांच्या मनात असतं. दुसरीकडे आपल्याला जो साप दिसतो तो प्रत्येक साप हा विषारीच असतो, असा देखील गौरसमज अनेकांच्या मनात असतो, त्यामुळे आपण काय करतो तर दिसला साप की त्याला लगेच मारतो. मात्र यामुळे सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आज भारतामधून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, मात्र त्यातील काही मोजक्याच प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या चार प्रमुख प्रजातींचा समावेश होतो, त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, किंवा पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका. कारण असं करणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. तुमच्या घराच्या आसपास साप आढळल्यास त्याची माहिती सर्प मित्रांना द्या.
तुम्हाला हे माहिती आहे का, निसर्गात अशी काही झाडं असतात, त्यांच्यामध्ये मुळातच असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात, ज्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. या झाडाच्या आसपास कायम साप आढळून येतात. यातीलच एक झाडं आहे, ते म्हणजे चंदनाचं झाडं. या झाडाबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे चंदनाला सुवासिक वास असतो, म्हणून साप या झाडांकडे आकर्षित होतात. परंतु ते तसं नाहीये, तर चंदनाच्या झाडांवर अनेकदा पक्षांची घरटे असतात, आणि याच पक्षांची शिकार करण्यासाठी त्यांची अंडी खाण्यासाठी साप या झाडाकडे आकर्षित होतात.
तसेच चंदनाला पानं देखील दाट असतात, त्यामुळे जी सापं झाडांवर राहतात, जसं की चापडा आणि इतर काही साप ते चंदनाच्या झाडाचा आश्रय घेतात. कारण त्यांना त्याठिकाणी लपण्यासाठी जागा मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे चंदनाच्या झाडाच्या आसपास आर्द्रतायुक्त वातावरण असतं, हे वातावरण सांपासाठी अनुकूल असतं. त्यामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना थोडं सावध असावं.
