Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला मोठं वळण, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या वर्गमित्राला हत्येच्या कटाची माहिती असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी झालेल्या या हत्येप्रकरणी रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agwarwal ) हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली होती, दोघेही सध्या तुरूंगात आहेत. आता याप्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रितेश हिंगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे.
लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात चेतन चौधरी आणि सिया गोयल यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या वर्गमित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
रितेशला आधीच होती कटाची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेशला केतनच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती, असा संशय आहे. चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणाच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे संभाषण रितेशने डिलीट केलं होतं. मात्र, पोलिसांनी ते रिकव्हर केल्यानंतर तपासात महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
बातमी अपडेट होत आहे.
