AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs PAKW Live: भारताकडून पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा, आशिया कपमध्ये पहिला विजय

| Edited By: | Updated on: Sep 05, 2026 | 10:23 PM
Share

India vs Pakistan Live Score, Womens Asia Cup 2026: वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

INDW vs  PAKW Live: भारताकडून पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा, आशिया कपमध्ये पहिला विजय

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Sep 2026 10:23 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: भारत जिंकला, आशिया कपमध्ये पहिला विजय

    महिला आशिया कपमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारताने भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला 55 धावांवर ऑलआऊट केले. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ 56 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर भारताने 7 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले आहे.

  • 05 Sep 2026 09:59 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: भारताला तिसरा धक्का

    भारताला आता तिसरा धक्का बसला आहे. ज्यामध्ये फातिमा सनाने स्मृती मंधानाला आऊट केलं. तिसऱ्या ओव्हरच्या सहाव्या चेंडूला तिने मंधानाला LBW केलं आहे.

  • 05 Sep 2026 09:46 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: टीम इंडियाला दुसरा धक्का, शफाली वर्मानंतर प्रतिका रावल बाद

    टीम इंडियाला प्रतिका रावलच्या रूपाने दुसरा धक्का बसला आहे. प्रतिका रावल 4 धावा करून तंबूत परतली आहे. फातिमा सनाने एकाच षटकात दोन विकेट काढल्या.

  • 05 Sep 2026 09:44 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: टीम इंडियाला पहिला धक्का, शफाली वर्मा बाद

    टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. शफाली वर्मा 12 धावांवर बाद झाली.  फातिमा सानाच्या गोलंदाजीवर तिनेच झेल पकडला.

  • 05 Sep 2026 09:38 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: शफाली वर्मा-स्मृती मंधाना जोडी मैदानात, पहिल्याच चेंडूवर षटकार

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना जोडी विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली आहे. शफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आक्रमक सुरूवात करून दिली. त्यामुळे 56 धावांचं आव्हान आणखी सोपं झालं आहे.

  • 05 Sep 2026 09:21 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानचा खेळ 55 धावांवर आटोपला, भारताला सोपं आव्हान

    पाकिस्तानचा संपूर्ण अवघ्या 55 धावांवर बाद झाला असून भारतासमोर 56 धावांचं सोपं आव्हान आहे. भारताकडून श्री चरणीने 3, प्रेमा रावतने 3, दीप्ति शर्माने 2 आणि शफाली वर्माने 1 विकेट घेतली. पाकिस्तानकडून शावल झुल्फिकारने सर्वाधिक 14 धावा केल्या. तर मुनीबा अलीने 13 धावा केल्या. तीन जणांना खातंही खोलता आलं नाही.

  • 05 Sep 2026 09:15 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानला नववा धक्का, नशरा संधू बाद

    पाकिस्तानला नशरा संधूच्या रुपाने नववा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या 54 धावांवर 9 विकेट पडल्या. नशरा संधूला खातही खोलता आलं नाही.

  • 05 Sep 2026 09:06 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानला आठवा धक्का, उम्म-ए-हानी बाद

    पाकिस्तानला उम्म ए हानीच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. प्रेमा रावतच्या गोलंदाजीवर अवघ्या 6 धावा करून तंबूत परतली आहे. पाकिस्तानची नाजूक स्थिती असून भारतीय गोलंदाज भारी पडले आहेत. 48 धावांवर पाकिस्तानची आठवी विकेट पडली.

  • 05 Sep 2026 09:00 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानला सातवा धक्का, आयमान फातिमा बाद

    पाकिस्तानने चांगली सुरूवात केल्यानंतर डाव घसरला. आयमान फातिमाच्या रुपाने सातवा धक्का बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती नाजूक झाली आहे.

  • 05 Sep 2026 08:42 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानला झटपट दोन धक्के

    पाकिस्तानला सदाफ शमासच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे.  तर फातिमा सानाच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. फातिमा सनाला खातंही खोलता आलं नाही.

  • 05 Sep 2026 08:34 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: आयेशा जफर बाद

    आयेशा जफरच्या रुपाने पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे. श्री चरणी पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. झटपट विकेट पडल्याने पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.

  • 05 Sep 2026 08:29 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: शावल झुल्फिकार बाद

    श्री चरणी एकाच षटकात पाकिस्तानला दोन धक्के दिले. फिरोजाला  बाद केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर शावल झुल्फिकारची विकेट काढली. शावल 14 धावा करून तंबूत परतली आहे.

  • 05 Sep 2026 08:26 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानला दुसरा धक्का, मुनीबानंतर फिरोजा बाद

    पाकिस्तानने सावध सुरूवात केली होती. मात्र मुनीबा बाद झाल्यानंतर पाकिस्तानला लगेचच दुसरा धक्का बसला. फिरोजाला खातंही खोलता आलं नाही. श्री चरणीच्या गोलंदाजीवर तिला तंबूत जावं लागलं.

  • 05 Sep 2026 08:21 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानला पहिला धक्का, शफाली वर्माने मुनीबाला तंबूत पाठवलं

    पाकिस्तानला मुनीबा अलीच्या रुपाने पहिला धक्का बसला. खरंं तर मुनीबाला 6 धावांवर असताना जीवदान मिळालं होतं. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात तिला अपयश आलं. मुनीबा अलीचा खेळ 13 धावांवर आटोपला.

  • 05 Sep 2026 08:15 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: मुनीबा अलीचा सोपा झेल सोडला

    क्रांती गौडच्या गोलंदाजीवर प्रतिका रावलने झेल सोडला. मुनीबा अलीचा सोपा झेल तिने सोडला. मुनीबाचा झेल सोडला तेव्हा ती 6 धावांवर खेळत होती.

  • 05 Sep 2026 08:05 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानचा डाव सुरू

    पाकिस्तानच्या डावाला सुरुवात झाली आहे. मुनीबा अली आणि शवाल झुल्फिकार खेळपट्टीवर आहेत. भारताकडून क्रांती गौडने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.

  • 05 Sep 2026 07:39 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: भारताची प्लेइंग 11

    भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड.

  • 05 Sep 2026 07:38 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: पाकिस्तानची प्लेइंग 11

    पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), शवाल जुल्फिकार, गुल फिरोजा, आयेशा जफर, सदफ शमास, फातिमा सना (कर्णधार), उम्म-ए-हानी, आयमान फातिमा, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल

  • 05 Sep 2026 07:37 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: काय म्हणाली कर्णधार हरमनप्रीत कौर

    भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने कौल गमावल्याने वाटेला प्रथम गोलंदाजी आली आहे. या निर्णयावर कौर म्हणाली की, आम्हाला पाठलाग करण्याची संधी मिळत आहे, हे चांगलं आहे. कर्णधार म्हणून 150वा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणे ही एक मोठी उपलब्धी आहे, महत्त्वाचे म्हणजे खेळाचा आनंद घेत राहणे. आम्ही त्यांना कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही तोच संघ घेऊन मैदानात उतरणार आहोत.

  • 05 Sep 2026 07:35 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: काय म्हणाली पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना?

    पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना म्हणाली की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत कारण आम्हाला येथे जास्तीत जास्त धावसंख्या उभारायची आहे. आमची गोलंदाजी चांगली आहे आणि आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आम्हाला फक्त खेळपट्टीनुसार खेळायचे आहे. आमचा संघ तोच ​​आहे.

  • 05 Sep 2026 07:33 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने, प्रथम फलंदाजीला प्राधान्य

    नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यामुळे पाकिस्तानला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. तसेच दिलेल्या धावा पूर्ण करून विजयी पताका फडकवण्याचा मानस आहे.

  • 05 Sep 2026 07:28 PM (IST)

    IND W vs PAK W Live Update: नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात होणार

    महिला टी20 आशिया कप 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सायंकाळी 7.30 वाजता होईल. कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर हा 150 वा सामना खेळत आहे.

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड होतंच आता भारताने विजय प्राप्त केला आहे.

Published On - Sep 05,2026 7:26 PM

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत