IND vs NZ: ईशान किशनला संधी मिळणार, वैभव सूर्यवंशीचा पत्ता कट होणार? तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार?
India Probable Playing XI for Third T20I: तिसऱ्या T20 आधी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्लेइंग इलेव्हनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना २७ ऑक्टोबर रोजी वेलिंग्टन येथे खेळला जाईल. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मांडीच्या दुखापतीमुळे इशान किशनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. खबरदारीचा उपाय म्हणून व्यवस्थापन इशानला तिसऱ्या टी२० सामन्यातूनही वगळू शकते. अशा परिस्थितीत दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळलेल्या वैभव सूर्यवंशीकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष असेल.
दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी तिसऱ्या क्रमांकावर खेळला, पण केवळ ४ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वैभव प्रचंड दबावाखाली दिसत होता, कारण तो त्या क्रमांकावर पहिल्यांदाच फलंदाजी करत होता. जर इशान तिसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर राहिला आणि वैभव संघात कायम राहिला, तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. कारण त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्र हा देखील इशानच्या जागी एक पर्याय आहे. भुवनेश्वर कुमार चार वर्षांनंतर भारतीय संघात परतला आहे. मात्र पुनरागमनानंतरच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने आठ षटके गोलंदाजी करून ९९ धावा दिल्या असून केवळ एक बळी घेतला आहे. केवळ दोन सामन्यांनंतर व्यवस्थापन भुवनेश्वरला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळेल का? बहुधा नाही. भुवनेश्वरवरील व्यवस्थापनाचा विश्वास कायम आहे.
टीम इंडियाने टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी वरिष्ठ खेळाडू अक्षर पटेलला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास फिरकी गोलंदाजाच्या जागेसाठी वरुण चक्रवर्ती किंवा कुलदीप यादव यांची निवड होऊ शकते. चक्रवर्तीला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते. प्रिन्स यादव अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासोबत तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संघात कायम राहू शकतो. याचा अर्थ मयंक यादवला पुन्हा एकदा संघाबाहेर बसावे लागू शकते. नितीश कुमार चौथा वेगवान गोलंदाज म्हणून कायम राहील.
तिसऱ्या T20I साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव
