AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Tamhankar : तुला या या लोकांसोबत झोपावं लागेल… सई ताम्हणकरला आला धक्कादायक फोन; काय होता प्रसंग?

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या सुरुवातीच्या करिअरमधील कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव नुकताच एका मुलाखतीत सांगितला. तिला काही लोकांसोबत 'झोपायला' सांगण्यात आले होते. सईने मात्र त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिले आणि असे प्रकार पुन्हा घडले नाहीत. तिच्या कुटुंबातील मोकळ्या वातावरणाने तिला या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत केली.

Sai Tamhankar : तुला या या लोकांसोबत झोपावं लागेल... सई ताम्हणकरला आला धक्कादायक फोन; काय होता प्रसंग?
Sai TamhankarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 10:29 PM
Share

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या फॉर्मात आहे. तिने मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही चांगला जम बसवला आहे. एवढंच नव्हे तर ओटीटीवरही सईची चांगलीच जादू सुरू आहे. एक यशस्वी अभिनेत्री म्हणून सईने स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण सांगलीतून मुंबईपर्यंतचा हा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासाच्या सुरुवातीलाच सईला एका धक्कादायक अनुभवातून जावं लागलं. जवळपास तो कास्टिंग काउचचाच प्रकार होता. पण सईने या परिस्थितीला धीरोदत्तपणे तोंड दिलं. करिअरपेक्षा चारित्र्य किती महत्त्वाचं असतं हे तिने दाखवून दिलं होतं.

सई ताम्हणकरची सोशल मीडियावर एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्यात तिने कास्टिंग काउचचा किस्सा सांगितलाय. तुला कास्टिंग काउचचा अनुभव आला नाही का? असा सवाल करताच सईने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. माझ्या सुरुवातीच्या करिअरच्या काळात मला एक फोन आला होता. हा हा रोल आहे, पण तुला या या लोकांसोबत झोपावं लागेल, असं समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं. त्यावर मी त्याला चांगलंच झापलं. भाई, हा मेसेज तू तुझ्या आईला पाठव, बापालाही पाठव. मला परत कधी असला मेसेज किंवा फोन करायचा नाही, अशा शब्दात मी त्या व्यक्तीला सुनावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 15-20 वर्षात असं कधी नंतर घडलं नाही. हे एकदाच झालं होतं, असं सईने सांगितलं. पण फोन करणारा कोण होता हे मात्र तिने सांगितलं नाही.

कोण मेसेज करतंय हे ठरवणं कठिण

अशा घटनांमध्ये यातील सत्य पडताळणं कठिण असतं. यातलं खरं ठरवणं कठिण असतं. कारण कोण बसून मेसेज करतोय, ते कळत नाही. मेसेज करणारा व्यक्ती तोच आहे की नाही हे आपल्याला काहीच माहीत नसतं, असंही सईने स्पष्ट केलं.

घरात स्वातंत्र्य होतं

सईने आपल्या कुटुंबातील वातावरणाबद्दलही या मुलाखतीत मोकळेपणाने सांगितलं. इतर कुटुंबांपेक्षा आमचं कुटुंब थोडं वेगळं होतं. कारण वडील मर्चंट नेव्हीत होते. त्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य होतं. आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे कपडे घालता येत होते. मला जी गोष्ट करावी वाटली ती करायला मिळत होती. कोणतीही बंधनं नव्हती. मी अशी काही टिपिकल ट्रॅडिशनल कुटुंबातील नाहीये, असं तिने सांगितलं.

वडील चांगले कूक

माझे वडील चांगले कूक होते. मला जे काही चांगलं सीफूड बनवता येतं ते केवळ वडिलांमुळेच. ड्राय फिश ते चांगली बनवायचे. स्वयंपाक आला पाहिजे अशी काही घरातून बंधन घातली गेली नाही.. फक्त आई एवढंच म्हणायची की, स्वत:साठी स्वयंपाक बनवता आला पाहिजे. घरातला हा दृष्टीकोण वेगळा होता, असंही ती म्हणाली.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत