AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद

New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद

| Updated on: Jul 22, 2026 | 1:34 PM
Share

दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने पुढील आदेश येईपर्यंत 16 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनामुळे मध्य दिल्ली आणि संसद परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने पुढील आदेश येईपर्यंत 16 मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनामुळे मध्य दिल्ली आणि संसद परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

DMRC ने सोशल मीडियावर याबाबत माहिती देत सांगितले की, सुरक्षा कारणास्तव 16 मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी प्रवेश (Entry) आणि बाहेर पडण्याची (Exit) सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या तीन इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.

बंद करण्यात आलेली 16 मेट्रो स्थानके:

* लोक कल्याण मार्ग
* राजीव चौक
* पटेल चौक
* रामकृष्ण आश्रम मार्ग
* बाराखंभा रोड
* सुप्रीम कोर्ट
* सेवा तीर्थ
* जनपथ
* मंडी हाऊस
* केंद्रीय सचिवालय
* आयटीओ (ITO)
* दिल्ली गेट
* इंद्रप्रस्थ
* खान मार्केट
* जोर बाग
* शिवाजी स्टेडियम

या स्थानकांवरून प्रवाशांना प्रवेश किंवा बाहेर पडता येणार नाही. मात्र, राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या इंटरचेंज स्थानकांवर एका मेट्रो मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

यापूर्वीही 20 आणि 21 जुलै रोजी CJP च्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर DMRC ने काही मेट्रो स्थानके तात्पुरती बंद केली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सेवा पूर्ववत करण्यात आली होती. सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या असून, पुढील आदेशानुसार मेट्रो सेवा सुरू किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Published on: Jul 22, 2026 01:34 PM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा