BMC Election: मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष लढण्याचा निर्णय, राजकीय वातावरण तापणार?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत बंडखोरी समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक 95 मध्ये हरी शास्त्री यांच्या उमेदवारीला विरोध करत स्थानिक शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. माजी नगरसेवक शेखर वायंगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना शिवसैनिकांचा पाठिंबा आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मातोश्रीच्या अंगणातच राजीनामा सत्राला सुरुवात झाली असून, अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. वॉर्ड क्रमांक 95 मध्ये पक्षाने हरी शास्त्री यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, स्थानिक शिवसैनिकांचा या उमेदवारीला तीव्र विरोध आहे. स्वर्गीय श्रीकांत सरमळकर यांचे जावई असलेल्या हरी शास्त्री यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आपले राजीनामे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांच्या निवासस्थानी आणले आहेत.
याच वॉर्डमधील माजी नगरसेवक शेखर वायंगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वायंगणकर हे अनिल परब यांचे कट्टर समर्थक मानले जातात. स्थानिक शिवसैनिकांनी वायंगणकर यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांनी कठीण काळात पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याचे म्हटले आहे. पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून एसीमध्ये बसणाऱ्या किंवा करोडपती उमेदवाराला तिकीट दिल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. यावरून दोन दिवसांपूर्वी अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात वाद झाल्याचेही वृत्त आहे.
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त

