बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला मिळणार हॉलतिकीट

| Updated on: Jan 19, 2024 | 10:13 PM

12 th Exam Hall Ticket Date : बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी हॉलतिकीटे मिळण्याची तारीख समोर आली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेला मिळणार हॉलतिकीट
Follow us on

मुंबई : देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. देशात उत्साहाचं वातावरण असून 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 22 जानेवारीला परीक्षेची हॉलतिकीट मिळणार आहेत. 22 जानेवारीपासून राज्य शासनाच्या वेब साईटवर ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीटे उपलब्ध होणार आहेत.

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी प्रिंट करून द्यायची आहेत. हॉलतिकीटे विद्यार्थ्याना देताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं शुक्ल आकारण्यात येवू नये, अशा सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.  त्यासोबतच ज्यांच्या हॉलतिकीटांमध्ये काही चुका दुरूस्त करायच्या असतील (उदा. सही, नावात, विषयात बदल किंवा इ.)  तर विभागीय मंडळात जाऊन सुधारव्यात.

फेब्रुवारीमध्ये या परीक्षा होणार असून आता परीक्षेची तारीख जवळ येऊ लागली आहे.  जसजशी तारीख जवळ येत आहे तसतशी विद्यार्थ्यांच्या मनातील धाकधूक वाढत चालली आहे.  बारावीची परीक्षा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची परीक्षा आहे. आता सीएटी, नीट सारख्या परीक्षांमुळे विद्यार्थी बारावी सुरू असताना या परीक्षांचा अभ्यास करतात.

दरम्यान, यंदाची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चमध्ये पार पडणार आहे. बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषायांची ऑनलाइन परीक्षा 20 ते 23 मार्चमध्ये होणार आहे.