विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक नियोजन ही संकल्पना राबवा : हिमांशू

| Updated on: Apr 27, 2024 | 2:21 PM

पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी नेहमीच प्रयत्न करताना दिसतात. चांगली शाळा, चांगले क्लासेस लावण्यावर पालकांचा अधिक भर असतो. आपण त्यांना यशस्वी होण्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने तयार राहण्यासाठी प्रत्येक संधी देऊ इच्छितो. त्यासाठीच सर्व प्रयत्न सुरू असतात.

विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक नियोजन ही संकल्पना राबवा : हिमांशू
students
Follow us on

विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक नियोजन कौशल्ये रुजवणे ही एक सामायिक जबाबदारी आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांच्यात मोठ्या प्रमाणात सहकार्य आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाची गुंतागुंत समजून घेणारी आणि त्यांच्या आर्थिक कल्याणाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम असलेली पिढी घडवण्यासाठी पालकांसोबत भागीदारीत गुंतवणूक करणे ही आमची जबाबदारी आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात यश मिळेल, असं झी लर्न लिमिटेडचे सीओओ हिमांशु याग्निक यांनी सांगितलं.

आम्ही पालक म्हणून आमच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आम्ही त्यांना यशस्वी होण्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने तयार राहण्यासाठी प्रत्येक संधी देऊ इच्छितो. मात्र, शिक्षणाच्या एका पैलूकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. तो पैलू म्हणजे आर्थिक नियोजन. याकरिता माउंट लिटेरा झी स्कूल्स इतरांपेक्षा वेगळ्या दिसतात. आर्थिक साक्षरता आणि व्यावहारिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या जबाबदार आणि दीर्घकाळ यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांनी सुसज्ज करत आहोत, असे झी लर्न लिमिटेडचे सीओओ हिमांशु याग्निक म्हणतात.

सर्वसमावेशक शिक्षणाच्या प्रयत्नात, सर्वांगीण व्यक्तींना आकार देणे ही आर्थिक साक्षरतेची प्रमुख भूमिका आहे. आर्थिक नियोजनासारख्या जीवनावश्यक कौशल्यांचा समावेश करण्यासाठी आमची बांधिलकी पारंपरिक शैक्षणिक विषयांच्या पलीकडेही विस्तारलेली आहे. आर्थिक साक्षरतेचे त्याच्या शैक्षणिक चौकटीत रूपांतर करून, केवळ शैक्षणिकदृष्ट्या प्रवीणच नव्हे तर व्यावहारिक जीवन कौशल्यांनी सुसज्ज असलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासात योगदान देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असं याग्निक म्हणाले.

आर्थिक साक्षरतेचे महत्त्व

आर्थिक साक्षरता निव्वळ कौशल्य संचापेक्षा अधिक आहे; हे एक मूलभूत जीवन कौशल्य आहे जे व्यक्तींना पैशाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी ज्ञान आणि साधनांनी सुसज्ज करते. जसजसे हे जग अधिकाधिक परस्परांशी जोडले जात असल्याचे आणि आर्थिक गुंतागुंतीमुळे प्रेरित होत असल्याचे आपण पाहत आहोत, तसतसे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे, त्यांच्या भविष्यातील यशासाठी आणि कल्याणासाठी अत्यावश्यक ठरते. आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या अविरत प्रयत्नांमध्ये, आर्थिक साक्षरता हा एक शैक्षणिक पैलू आहे, ज्याकडे पालकांचे अनेकदा दुर्लक्ष होते.

पालकांकरिता व्यावहारिक सूचना

जबाबदार आर्थिक निर्णय घेण्याच्या पाया आयुष्यभर रचत, आर्थिक शिक्षणाची सुरुवात मुलाच्या जीवनाच्या सुरुवातीलाच झाली पाहिजे. या प्रक्रियेत पालक महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलांची पैशाप्रतीची मनोवृत्ती आणि वागणूक आकारण्यात पालकांचा प्रभाव महत्त्वाचा असतो. शिक्षणाच्या व्यापक क्षेत्रात आर्थिक साक्षरतेचे एकत्रीकरण करून लवकर सुरुवात करण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. इयत्ता 6 वी पासून व्यावसायिक कौशल्य पर्याय म्हणून आर्थिक साक्षरतेची शिफारस CBSE करते, तर आर्थिक साक्षरतेची मूलभूत तत्त्वे इयत्ता 4 वी पासून सुरू होतात.

पैशासंबंधी विषय मनमोकळेपणाने बोलणे आवश्यक

कुटुंबाला पैशाबद्दल मनमोकळी आणि वयानुरूप चर्चा करण्यास प्रोत्साहित करा. अंदाजपत्रक, बचत आणि पैशाचे मूल्य याबद्दल अंदाजाचे आदान-प्रदान करा. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि त्यांना आर्थिक संभाषणात सामील केल्याने विषय स्पष्ट होण्यास मदत होते आणि पैशाबद्दल दृष्टीकोन निरोगी राहतो. कुटुंबात ‘हात सैल सोडून खर्च करणारा कोण आहे’ हे शोधण्यासाठी समर्पित अध्याय आहेत, प्रमुख वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देऊन आयोजित केलेला हा एक मनोरंजक उपक्रम आहे.

बचतीचे उदाहरण तयार करा

बचतीच्या बाबतीत उदाहरणादाखल नेतृत्व करा. कौटुंबिक बचतीचे उद्दिष्ट आणि त्या दिशेने काम करणे हे मुलांना आर्थिक नियोजनाचे मूर्त प्रदर्शन प्रदान करते. हा प्रत्यक्ष अनुभव भविष्यातील उद्दिष्टांसाठी बचतीचे महत्त्व रुजवतो.

बजेटींगविषयीचे मूलभूत तत्त्व सादर करा

जसजशी मुले मोठी होतात, तसतशी हळूहळू त्यांना आर्थिक अंदाजपत्रक (बजेटींग) या संकल्पनेची ओळख करून द्या. बचत, खर्च आणि शेअरिंग यासह विविध हेतूंसाठी पैशाचे वाटप त्यांना शिकवा. छोट्या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक तयार करणे किंवा मर्यादित भत्ता व्यवस्थापित करणे यासारखे व्यावहारिक उपक्रम शिकण्याचे मौल्यवान अनुभव म्हणून काम करू शकतात. विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून, वाढदिवसाची मेजवानी आणि कौटुंबिक सुट्ट्यांचे नियोजन विशिष्ट अंदाजपत्रकात कसे करावे याचा समावेश आहे. अशा प्रामाणिक आणि खुल्या चर्चा; त्याचप्रमाणे दस्तऐवजीकरणामुळे तरुण विद्यार्थी अंदाजपत्रकाकडे संयम म्हणून नव्हे तर व्यावहारिक आणि शहाणपणाची कृती म्हणून पाहतात. आर्थिक अंदाजपत्रक (बजेटींग) ही सकारात्मक वृत्ती त्यांना भविष्यात व्यावहारिक निर्णय घेण्यास सक्षम करेल.