Indian Army Recruitment : 12वी पास विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी! 18 लाखांचे मिळणार पॅकेज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख
12 वी तरूणांना जर आर्मीमध्ये जाण्याची इच्छा असेल तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे, भारतीय आर्मीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थांना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने 12 वी टेक्नीकल एंन्ट्री स्किम भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय घेतलेल्या विद्यार्थांना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम जाणून घ्या.
कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 60 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने JEE MAIN 2026 परीक्षा दिलेली असावी.तसेच भरतीसाठी केवळ अविवाहित पुरूष उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय 16 ते 19 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल
या भरतीसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. बारावीतील गुण आणि JEE MAIN 2026 मधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ( SSB)
या भरतीसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. बारावीतील गुण आणि जेईई मेन २०२६ मधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर गुणवत्ता यादी आणि निर्धारित निवड प्रक्रियेनुसार अंतिम निवड केली जाईल.
चार वर्षांचे प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी पदवी
या योजने अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये लष्करी प्रशिक्षणासोबतच अभियांत्रिकिचे शिक्षणही दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा 56,100 रूपये विद्यावेतन मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण करून निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आभियांत्रिकी पदवी, लेफ्टनंट पदावरील नियुक्ती आणि कायमस्वरूपी कमिशनही मिळेल. नियुक्तीनंतर वेतनश्रेणीनुसार पगार आणि भत्ते दिले जातील. या पदासाठी वार्षिक पॅकेज सुमारे 17 ते 18 लाख रूपये देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तेथे ऑफिसर ट्रेनिंग विभागातील TES -57 भरतीची लिंक नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून वैयक्तिक माहिती. शैक्षणिक तपशील, बारावीतील गुण आणि JEE MAIN 2026 संदर्भातील माहिती भरावी.