JNU मध्ये MBA करायचंय?, 2021-23 साठी अ‍ॅडमिशन नोटिफिकेशन जारी

| Updated on: Jun 19, 2021 | 11:35 AM

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या अटलबिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपने आपल्या एमबीए प्रोग्रामच्या तिसर्‍या बॅचसाठी प्रवेश जाहीर केला आहे. (JNU Admission process MBA program 2021-2023)

JNU मध्ये MBA करायचंय?, 2021-23 साठी अ‍ॅडमिशन नोटिफिकेशन जारी
फोटो : प्रातिनिधिक
Follow us on

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या अटलबिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपने आपल्या एमबीए प्रोग्रामच्या तिसर्‍या बॅचसाठी प्रवेश जाहीर केला आहे. ABVSME जेएनयूच्या दोन वर्षाच्या पूर्णवेळ एमबीए (2021-23) प्रवेशासाठी कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी 10 जून 2021 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलीय. (JNU Admission process MBA program 2021-2023)

कोरोनाकाळातली 2019 मधली विद्यार्थ्यांची पहिली बॅच पदवीसाठी तयार आहे. विद्यापीठ एका समग्र दृष्टीकोनावर विश्वास ठेवते आणि विद्यार्थांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जगभरातील ज्ञान देण्यात विद्यापीठ अग्रणी आहे, असं कुलगुरुंनी सांगितलं. एबीव्हीएसएमईचे उद्दीष्ट आहे की व्यवस्थापन शिक्षण आणि उद्योगाच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करावे आणि कॉर्पोरेट व्यावसायिक, मंत्रालयीन कर्मचारी आणि नागरी नोकरांना आमंत्रित करून नियमितपणे कार्यशाळा, व्याख्याने आणि राऊंड टेबल आयोजित कराव्यात.

इंटर्नशिप व्यतिरिक्त इथल्या विद्यार्थ्यांना नाबार्ड, अ‍ॅक्सिस कॉर्पोरेशन, जीई हेल्थकेअर, आयटीसी लिमिटेड, केपीएमजी ईन्डवाय, पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड सारख्या संस्थांसमवेत फायनल प्लेसमेंट मिळाले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे.

अधिसूचना किंवा इतर प्रवेशाशी संबंधित माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या : http://www.jnu.ac.in/abvsme-admission

(JNU Admission process MBA program 2021-2023)

हे ही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच सुरु होणार ‘जयभीम मुख्यमंत्री’ क्लासेस!

AIIMS Recruitment 2021: सीनियर रेजिडेंटच्या 106 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस, असा करा अर्ज…

JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं….