आता एकाच सत्रात दोन डिग्री घेता येणार, इग्नूने उपलब्ध करुन दिली संधी

| Updated on: Feb 19, 2021 | 5:28 PM

आता एकाच सत्रात दोन डिग्री घेता येणार, इग्नूने उपलब्ध करुन दिली संधी (Now you can take two academic degrees at the same time)

आता एकाच सत्रात दोन डिग्री घेता येणार, इग्नूने उपलब्ध करुन दिली संधी
आता एकाच सत्रात दोन डिग्री घेता येणार
Follow us on

नवी दिल्ली : एकाच सत्रात विद्यार्थ्यांना दोन डिग्री मिळण्याची ही मोठी संधी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ(इग्नू)ने उपलब्ध करुन दिली आहे. याद्वारे विद्यार्थी त्यांच्या मूळ विषयांव्यतिरिक्त इग्नू कडून इतर आवडत्या विषयांचा अभ्यास करू शकतील. देशातील कोणत्याही विद्यापीठात नियमित शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासासह नियमितपणे इग्नूकडून 6 महिन्यांचे प्रमाणपत्र कोर्स शिकता येईल. प्रथमच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जात आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील विद्यार्थी आता नियमित अभ्यासक्रमासोबतच इग्नूद्वारा संचालित प्रमाणपत्र कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. यासाठी युजीसीने परवानगी दिली आहे. (Now you can take two academic degrees at the same time)

विद्यार्थी एकाच सत्रात 2 डिग्री घेऊ शकतात

इग्नूने उपलब्ध केलेल्या संधीमुळे विद्यार्थी त्यांच्या मूळ विषयांसोबतच इतर आवडीच्या विषयांचाही अभ्यास करु शकतील. यामध्ये फ्रेंच भाषेतील प्रमाणपत्र, इंग्रजीचे अध्यापन प्रमाणपत्र, आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन प्रमाणपत्र, ग्राहक संरक्षणात प्रमाणपत्र, अँटी ह्यूम ट्रॅफिकिंग इन सर्टिफिकेट, एचआयव्ही आणि कौटुंबिक शिक्षणाचे प्रमाणपत्र यासह अनेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सर्व कोर्स सहा महिने कालावधीसाठी असतील. तसेच यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

एकूण 84 अभ्यासक्रमांचा समावेश

प्रादेशिक संचालक अभिलाष नायक यांच्या माहितीनुसार असे एकूण 84 प्रमाणपत्र कोर्स इग्नूमार्फत चालवले जात आहेत, ज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोर्ससाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. या सर्व अभ्यासक्रमांपैकी 31 अभ्यासक्रम पाटणा येथे घेण्यात येत आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्राच्या बाहेर जाऊन नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल. (Now you can take two academic degrees at the same time)

 

 

इतर बातम्या

CTET answer key 2021: सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या डायरेक्ट लिंकवरुन करा डाऊनलोड

Airtel युजर्ससाठी खुशखबर! कंपनीकडून मोफत 6 GB का डेटा