राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर, थेट..

| Updated on: Jan 20, 2024 | 5:01 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील एक अत्यंत हैराण करणारा प्रकार हा नुकताच पुढे आलाय. विद्यार्थ्यांनी नुकताच काही गंभीर आरोप हे विद्यापीठ प्रशासनावर केले आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच मोठे नुकसान झाल्याचे बघायला मिळतंय.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर, थेट..
Follow us on

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. एक अत्यंत हैराण करणारा आणि धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलाय. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या बीएसस्सी चतुर्थ वर्षातील 65 टक्के विद्यार्थ्यांना गणितात शून्य गुण मिळाल्याचा हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना 1 ते 20 पर्यंतचे गुण मिळाले. विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. उत्तरपत्रिकेचे पूनर्मुल्यांकन करावे, न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यींची आहे. गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या बीएसस्सी चतुर्थ वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी हिवाळी 2023 मध्ये परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 12 जानेवारी जाहीर करण्यात आला. हा निकाल हाती पडताच विद्यार्थ्यांना धक्का बसला.

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातून परीक्षेला बसलेल्या 65 टक्के विद्यार्थ्यांना गणित विषयात शून्य गुण मिळाले तर 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना 1 ते 20 पर्यंतचे गुण देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.

गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या बीएसस्सी चतुर्थ वर्षातील 65 टक्के विद्यार्थ्यांना गणितात शून्य गुण दिले. 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना 1 ते 20 पर्यंतचे गुण दिले आहे. यावर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गोंदिया येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

उत्तरपत्रिकेचे पूनर्मुल्यांकन करावे, न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत जवळपास 40 विद्यार्थ्यांनी प्राचार्य डाॅ. अंजन नायडू यांच्याकडे धाव घेतली. यावर प्राचार्य नायडू यांनी हा प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला. तांत्रिक समस्येतून हा प्रकार घडला असावा, असल्याचे सांगितले जातंय.

उत्तर पत्रिकेचे पूनर्मुल्यांकन करावे, पूनर्मुल्यांकन व री-एक्झामकरिता लागलेले शुल्क परत करावे, शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी गोंदिया शहर युवक काँग्रेस त्यांच्यासोबत उभे असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लवकरात लवकर यावर तोडग काढला नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाला कुलूप ठोकू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.