जुळ्या बहिणींनी केली कमाल, थेट सीए फायनलमध्ये टॉपर, मुंबईमध्ये शिक्षण ते…

| Updated on: Jan 10, 2024 | 7:11 PM

नुकताच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्याकडून सीए फायनलचा निकाल जाहिर करण्यात आलाय. या निकालानंतर दोन बहिणींचे नाव जोरदार चर्चेत आहे. फक्त चर्चेतच नाही तर लोक या दोघींचे काैतुक करताना दिसत आहेत. या दोघी बहिणींने जबरदस्त यश मिळवल्याचे बघायला मिळतंय.

जुळ्या बहिणींनी केली कमाल, थेट सीए फायनलमध्ये टॉपर, मुंबईमध्ये शिक्षण ते...
Follow us on

मुंबई : सध्या दोन जुळ्या बहिणींची चर्चा ही तूफान रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघींची कामगिरी पाहून त्यांचे काैतुक केले जातंय. नुकताच सीए इंटर नोव्हेंबर आणि अंतिम निकाल लागला आहे. सीए अंतिम निकाल 2023 नंतर दोन बहिणी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्याकडून सीए फायनलच्या निकालासोबतच आयसीएआयद्वारे टॉपर्सची लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या निकालात जुळ्या बहिणींनी गगणाला गवसणी घातलीये. दोन जुळ्या बहीणी सीए तर झाल्याच आहेत. विशेष बाब म्हणजे दोघीही सीए फायनल परीक्षेत टॉपर्स देखील राहिल्या आहेत.

विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींचे शिक्षण हे सर्व मुंबईमध्येच झाले आहे. संस्कृती अतुल पारोलिया आणि श्रुती अतुल पारोलिया ही या बहिणींची नावे आहेत. संस्कृती हिला ऑल इंडिया रँक 2 मिळाली आहे तर तिचीच जुळी बहीण श्रुती हिला टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्यात मोठे यश मिळाले आहे. आता या दोघींच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

विशेष बाब म्हणजे फक्त श्रुती आणि संस्कृतीच नाही तर त्यांचे वडील आणि भाऊ देखील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत. या दोघी बहिणींचे सर्व शिक्षण हे एकसोबतच झाले आहे. मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कॉमर्सचे शिक्षण यांनी चर्चगेटच्या काॅलेजमध्ये घेतले. संस्कृती अतुल पारोलिया आणि श्रुती अतुल पारोलिया यांचे वडील अतुल परोलिया हे देखील सीए आहेत.

फक्त वडीलच नाही तर संस्कृती आणि श्रुतीचा भाऊ देखील सीए आहे. आता तर दोघी जुळ्या बहीणी परीक्षेमध्ये टाॅपर ठरल्या आहेत. या दोघी बहिणींचे सतत काैतुक केले जात आहे. विशेष म्हणजे संस्कृती आणि श्रुती पारोलिया यांचा हा सीएचा पहिलाच प्रयत्न होता. पहिल्याच प्रयत्नामध्ये या दोघी सीए झाल्या आहेत. दोन्ही बहिणींनी सीए ग्रुप 1 आणि ग्रुप 2 च्या परीक्षा एकत्र दिल्या होत्या हे देखील विशेष आहे.