CBSE : केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! खासदार कोट्यासंबंधित महत्त्वाचा निर्णय

| Updated on: Apr 15, 2022 | 3:23 PM

गेल्या आठवड्यात लोकसभेतले काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केंद्रीय विद्यालयातील खासदार कोट्याचा मुद्दा उचलून धरला होता. एकतर या कोट्यातील जागा वाढवा ( 10 च जागांसाठी शिफारस करता येते) किंवा हा कोटाच रद्द करा अशी मागणी त्यांनी केली होती.

CBSE : केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! खासदार कोट्यासंबंधित महत्त्वाचा निर्णय
केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्ली : शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची (Parents) एक वेगळीच कसरत पाहायला मिळते. शिक्षणाचा (Education) उत्तम दर्जा आणि फी देखील कमी म्हणून अनेक पालकांचा कल केंद्रीय विद्यालयांकडे (CBSE Schools) असतो. केंद्रीय विद्यालयाचा आकडा देशभरात जवळपास बाराशेच्या आसपास आहे. या विद्यालयात प्रवेश मिळवणं सुद्धा अवघड असतं. ही बातमी त्याच पालकांसाठी आहे ज्यांना आपल्या पाल्याला केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्याची इच्छा आहे. खासदार कोट्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना स्थगिती देण्यात आलीये. पुढच्या आदेशापर्यंत खासदार कोटा बंद राहणार आहे. हा कोटा कायमचा बंद करायचा का याविषयी विचार करण्यासाठी समिती देखील बनवण्यात येणार आहे.

तूर्तास फक्त स्थगिती

केंद्रीय संघटनेकडून सांगण्यात आलंय की यावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही तूर्तास फक्त स्थगिती देण्यात आली आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी, केंद्रीय विद्यालयातील कर्मचारी कोटा या प्रकारच्या विशेष कोट्यांबाबत सुद्धा विचार केला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या आठवड्यात लोकसभेतले काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केंद्रीय विद्यालयातील खासदार कोट्याचा मुद्दा उचलून धरला होता. एकतर या कोट्यातील जागा वाढवा ( 10 च जागांसाठी शिफारस करता येते) किंवा हा कोटाच रद्द करा अशी मागणी त्यांनी केली होती. बऱ्याच खासदारांनी हा प्रकारच भेदभाव निर्माण करणारं असल्याचं म्हणत कोटा रद्द करण्याची मागणी केली होती. मागणीनंतर या कोट्याला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचं घोषित करण्यात आलंय.

खासदारांनी शिफारस करून 10 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची मुभा

आधी केंद्रीय विद्यालयात खासदारांनी शिफारस करून 10 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची मुभा होती. यावरून अनेक मतभेद होत होते. शेकडोंचे अर्ज येऊन प्रवेश केवळ 10 विद्यार्थ्यांनाच देता येत असल्यामुळे हा कोटा एकतर रद्द करा किंवा वाढवा अशी मागणी करण्यात येत होती. मागच्या वर्षी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा 450 प्रवेशाचा कोटा देखील बंद करण्यात आला होता.

इतर बातम्या :

Kishori Pednekar : राणांची मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा, किशोरी पेडणेकरांनी ऑन एअर झाडलं

chaitra purnima 2022| चैत्र पौर्णिमेचे महत्त्व काय ? जाणून घ्या या दिवशी काय उपाय करावेत

Lemon Rate : सब गोलमाल..! उत्पादकांपेक्षा व्यापारीच मालामाल, काय आहे बांधावरची स्थिती?