Kolkata Port Vidhansabha Election Result 2021 LIVE: कोलकता पोर्ट विधानसभा मतदारसंघात भाजप-तृणमूलमध्ये काँटे की टक्कर

| Updated on: May 02, 2021 | 6:10 AM

Kolkata Port Assembly Election Result 2021 Live Update in Marathi | भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावून ही निवडणूक लढवली होती.

Kolkata Port Vidhansabha Election Result 2021 LIVE: कोलकता पोर्ट विधानसभा मतदारसंघात भाजप-तृणमूलमध्ये काँटे की टक्कर
Follow us on

कोलकाता: गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची घटिका आता जवळ येऊन ठेपली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या (West Bengal Election) एकूण 294 जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान झाले. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावून ही निवडणूक लढवली होती. (Kolkata Port Vidhansabha Election Result 2021)

या निवडणुकीत प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक असलेल्या कोलकाता पोर्ट विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे डोळे लागले होते. यंदाच्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसने या मतदारसंघातून विद्यमान आमदार फरहाद हकीम यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून किशोर गुप्ता यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. याशिवाय, काँग्रेस, सीपीएम आणि आयएसएफ या आघाडीने कोलकाता पोर्ट मतदारसंघासाठी मोहम्मद मुख्तार यांना तिकीट दिले होते. या मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत ही तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचे सांगितले जाते. 294 जागा असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत बहुमतासाठी 148 आमदारांची गरज आहे.

2016 मध्ये या मतदारसंघात काय झाले होते?

कोलकाता पोर्ट विधानसभा मतदारसंघ हा 2011 साली अस्तित्त्वात आला होता. पहिल्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसचे फरहाद हकीम विजयी ठरले होते. 2016 सालच्या विधानसभा निवडणुकीत कोलकाता पोर्ट विधानसभा मतदारसंघात 138082 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी 73459 मते विद्यमान आमदार फरहाद हकीम यांना मिळाली होती. तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांच्या उमेदवाराला अवघी 11700 मते मिळाली होती.

गेल्या निवडणुकीतील आकडेवारी

विद्यमान आमदार- फरहाद हकीम
एकूण मिळालेली मते- 73459
एकूण मतदार- 217685
मतदानाची टक्केवारी- 63.43 टक्के
एकूण उमेदवार- 11

(Kolkata Port Vidhansabha Election Result 2021)