West Bengal Election: ममता बॅनर्जींच्या मदतीला जया बच्चन धावल्या; पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा प्रचार करणार

| Updated on: Apr 04, 2021 | 7:47 PM

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव करण्यासाठी भाजपने सुपरस्टार मिथुन चक्रवर्तींना प्रचाराचा मैदानात उतरवले आहे. (Jaya Bachchan Will Campaign For Trinamool)

West Bengal Election: ममता बॅनर्जींच्या मदतीला जया बच्चन धावल्या; पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा प्रचार करणार
Jaya Bachchan
Follow us on

कोलकाता: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये पराभव करण्यासाठी भाजपने सुपरस्टार मिथुन चक्रवर्तींना प्रचाराचा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे बंगालमधील मिथुन चक्रवर्तींचं वादळ रोखण्यासाठी समाजवादी पार्टीने अभिनेत्री जया बच्चन यांना ममतादीदींच्या मदतीसाठी पाठवलं आहे. जया बच्चन या बंगालमध्ये प्रचार करणार आहेत. त्यामुळे दोन दिग्गज कलाकार बंगालच्या रणभूमीत उतरणार असल्याने बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Jaya Bachchan Will Campaign For Trinamool)

ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराच्या लिस्टमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपा नेते अखिलेश यादव आणि राजद नेते तेजस्वी यादव यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना पत्रं लिहून भाजपविरोधात राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

उद्यापासून प्रचार

जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या नेत्या आहेत. त्या आज रात्रीच कोलकाताला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या 5 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत त्या बंगालमध्ये राहणार आहेत. बंगालमध्ये त्या टालीगंजमध्ये टीएमसीचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनासाठी रोड शो करतील. अरुप विश्वास यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना उतरवले आहे.

अनेक उमेदवारांचा प्रचार करणार

जया बच्चन या टीएमसीच्या अनेक उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. जया बच्चन या 6 आणि 7 एप्रिल रोजी विविध विधानसभा मतदारसंघात जाऊन टीएमसीच्या उमेदवारांसाठी रोड शो करतील. बंगालमध्ये टीएमसीने बांग्ला निजेर मेयके चाय (बंगालला आपली कन्या हवी आहे) हा नारा दिला आहे. जया बच्चन या बंगालच्या कन्या आहेत. आता त्या बंगालच्या दुसऱ्या कन्या ममतादीदींच्या प्रचाराला आल्या आहेत, असं सुब्रत मुखर्जी यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगालमधील ही लढाई ममता बॅनर्जी आणि भाजप या दोहोंच्या भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे. (Jaya Bachchan Will Campaign For Trinamool)

 

संबंधित बातम्या:

West Bengal Election: ममता बॅनर्जी देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री, हॅट्रीक साधणार की विकेट पडणार?; नंदीग्रामचे मतदार देणार कौल

भाजपच्या विरोधात एकत्र या, ममता बॅनर्जी यांचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझं गोत्र ‘शांडिल्य’, असदुद्दीन ओवेसी भडकले!

(Jaya Bachchan Will Campaign For Trinamool)