मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लेकाची फीस ऐकून बसेल मोठा धक्का, एका वर्षाला कोट्यवधी..

| Updated on: Apr 21, 2024 | 12:59 PM

मलायका आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. अरहान खान हा त्याच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसतोय. मलायका अरोरा ही अरहान खान याच्या शोमध्ये पोहचली होती. हेच नाही तर अरहान हा सध्या सोशल मीडियावर देखील चांगलाच चर्चेत दिसतोय.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लेकाची फीस ऐकून बसेल मोठा धक्का, एका वर्षाला कोट्यवधी..
Arhaan Khan
Follow us on

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान सध्या तूफान चर्चेत आहे. अरहान खान हा दम बिरयानी पॉडकास्टमधून मोठे खुलासे करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच अरहान खान याच्या या शोमध्ये वडील अरबाज खान, काका सोहेल खान पोहचले होते. हेच नाही तर आई मलायका अरोरा देखील अरहान खानच्या शोमध्ये पोहचली. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले. पहिल्यांदाच मलायका अरोरा ही असे जाहिरपणे आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसली. हेच नाही तर अरबाज खान हा थेट घटस्फोटाबद्दल बोलताना देखील दिसला.

अरहान खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याचे सांगितले जातंय. अरहान खान हा सध्या उच्च शिक्षण विदेशात घेतोय. वडील अरबाज खान यांच्या लग्नात धमाल करतानाही अरहान खान हा दिसला. शूरा खान आणि अरहान खान यांचे देखील चांगले रिलेशन आहे. वडील अरबाज खान, सावत्र आई शूरा खान यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच जेवणासाठी अरहान खान गेला होता.

अरहान खान हा लाँग आयलँड विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे. अरहान खान हा चित्रपटाशी संबंधित विषयात शिक्षण घेत आहे. रिपोर्टनुसार अरहान खान हा शिक्षण घेत असलेल्या कोर्सची फीस ही 1.2 कोटी आहे. म्हणजेच काय तर मलायका अरोरा आणि अरबाज खान हे लेकाच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रूपये खर्च करतात. अनेकदा मुलाला विमानतळावर सोडण्यासाठी मलायका आणि अरबाज एकत्र येतात.

अरहान खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट आहे. बाॅलिवूडमध्ये काम करण्याचे अरहान खान याचे स्वप्न आहे. हेच नाही तर सलमान खान हाच अरहान खान याला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार असल्याची चर्चा आहे. अरहान खान हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतोय. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अरहान दिसतो.

अरहान खान हा त्याच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसतोय. आता आई वडील आणि काकानंतर अरहान खानच्या शोमध्ये गेस्ट म्हणून कोण येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळत आहे. अरहान खान हा काही दिवसांपूर्वीच विदेशात मलायका अरोरा आणि ओरीसोबत धमाल करताना दिसला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना देखील दिसले.