U.V. Krishnam Raju Death : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासवर कोसळला दुःखाचा डोंगर कुटुंबातील ‘या’ व्यक्तीचे निधन

| Updated on: Sep 11, 2022 | 11:52 AM

या चित्रपटासाठी त्यांना नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ अभिनेते एनटी रामाराव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णम राजू यांनी जवळपास 183 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

U.V. Krishnam Raju Death : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासवर कोसळला दुःखाचा डोंगर कुटुंबातील या व्यक्तीचे निधन
U.V. Krishnam Raju
Image Credit source: Instagram
Follow us on

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही.कृष्णम राजू (U.V. Krishnam Raju) यांनी आज पहाटे 3:45 च्या सुमारास   अखेरचा श्वास घेतला. ते 82 वर्षाचे होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्णम राजू हे दक्षिण चित्रपटसृष्टीचे बंडखोर स्टार मानले जात होते आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत (South  film industry)सक्रिय असताना त्यांच्या हिट चित्रपटाने आपली कारकिर्द गाजवली . मात्र शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृष्णम राजू हे अभिनेता प्रभासचे काका होते. या अभिनेत्याच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीतील तमाम कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनीही कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘तेलुगू चित्रपटसृष्टीतील आवडते स्टार आणि माजी केंद्रीय मंत्री यू व्ही कृष्णम राजू   आम्हाला सोडून गेले हे जाणून दुःख झाले. त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने लाखो मने जिंकली आणि समाजाच्या भल्यासाठी काम केले. त्याच्या जाण्याने आपल्या तेलुगु चित्रपटसृष्टीत एक खोल पोकळी निर्माण झाली आहे. माझ्या संवेदना.

हे सुद्धा वाचा

याबरोबरच साऊथचे दिग्दर्शक मारुती यांनीही सोशल मीडियावर कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘ज्येष्ठ अभिनेते आणि विद्रोही स्टार कृष्णम राजू आता आमच्यात नाहीत हे जाणून खूप दुःख झाले. प्रभास गरू आणि त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. भगवान कृष्णम राजू सर यांच्या आत्म्याला शांती लाभो. तू नेहमी आमच्या हृदयात राहशील.

कृष्णम राजूच्या कारकीर्द

कृष्णम राजूच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, सिनेमात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. 1996 मध्ये त्यांनी ‘चिलाका गोरनिका’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने  त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटासाठी त्यांना नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ अभिनेते एनटी रामाराव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णम राजू यांनी जवळपास 183 चित्रपटांमध्ये काम केले आहे.